पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात आज(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. भारताचा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राने दुसऱ्याच षटकात मोहम्मद हुरेराला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतरही सुशांतने त्याचा तिखट मारा सुरु ठेवला होता. याचवेळी त्याने टाकलेला सामन्याच्या चौथ्या षटकातील तिसरा चेंडू पाकिस्तानचा फलंदाज हैदर अलीच्या डाव्या खांद्याला लागला. त्यामुळे तो खाली पडला. त्याला चेंडू लागलेला पाहून लगेचच सुशांतने त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस केली.
या क्षणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी सुशांतचे त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीसाठी कौतुक केले आहे.
अलीला चेंडू लागल्यानंतर काहीवेळातच पाकिस्तान संघाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी अलीला तपासले. काही मिनिटानंतर पुन्हा अली फलंदाजीसाठी तयार झाला.
https://twitter.com/hamzabutt61/status/1224617650560622592
यानंतर अलीने चांगली फलंदाजी करताना 77 चेंडूत 9 चौकारांसह 56 धावांची खेळी केली. तो 26 व्या षटकात यशस्वी जयस्वालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तो बाद झाल्यानंतर केवळ कर्णधार रोहेल नाझीरने चांगली लढत देताना 62 धावांची खेळी केली. मात्र पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.
पाकिस्तानकडून अली, रोहेल आणि मोहम्मद हॅरिस(21) व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 43.1 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून सुशांतने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. तसेच अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
न्यूझीलंड विरुद्ध भारत: केन विलियम्सन न्यूझीलंड संघातून बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी
वाचा👉https://t.co/UVirSzM1JF👈#म #मराठी #Cricket #NZvIND #KaneWilliamson— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020
टीम इंडियाला उद्या मिळणार नवीन सलामीवीरांची जोडी, विराट कोहलीने केला खूलासा
वाचा👉https://t.co/BSL9gUqppR👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020