जगभरात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांचा जन्म भारतात झाला आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात भारतात क्रिकेट खेळले. पण नंतर इतर देशांकडून आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केले. अशा खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर यादी खूप मोठी आहे. काहींनी इतर देशांतून खेळून खूप नाव कमावलं तर काही जण नंतर दिसेनासे झाले.
भारतीय खेळाडू सिमी सिंग
भारतातील पंजाबमध्ये जन्मलेला सिमी सिंग (Simi Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडकडून (Ireland) खेळतो आहे. सिमी सिंग अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांचा जन्म भारतात झाला आणि नंतर इतर देशांतून खेळायला सुरुवात केली. नुकतेच सिमी सिंगने एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) खेळताना एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. जाणून घेऊया सिमी सिंगची संपूर्ण कहाणी.
स्टुडंट व्हिसा घेऊन आयर्लंडला पोहोचला
36 वर्षीय क्रिकेटपटू सिमी सिंगचा जन्म पंजाबमधील साहिबजादा अजित सिंग नगर येथे झाला. सिमरनजीत सिंग म्हणजेच सिमी सिंगला भारतामध्ये क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नव्हती. यानंतर सिमी सिंग स्टुडंट व्हिसा घेऊन आयर्लंडला गेला आणि तिथेही तो क्रिकेट खेळत राहिला.
सिमी सिंग 2017 मध्ये त्याने आयर्लंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याचे नाव सर्वत्र पसरू लागले. 2019 मध्ये, त्याने आंतर-प्रांतीय चॅम्पियनशिपमध्ये आयर्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. एका वर्षानंतर, त्याला आयर्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली.
गेल्या वर्षी सिमीचे नाव चर्चेमध्ये आले होते. जिथे त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तर, त्याने 2021 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 धावांची नाबाद खेळी देखील खेळली होती.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली
सिमी सिंगने आतापर्यंत आयर्लंडकडून 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने 39 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, त्याने 593 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये नाबाद 100 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सिमीने आयर्लंडकडून 53 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 1 अर्धशतकासह 296 धावा करताना 44 बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुभमंगल सावधान! प्रसिद्ध कृष्णाही बांधला गेला लग्नबंधनात, नवदाम्पत्याचे फोटो व्हायरल
WTC FINAL: ‘सेन्सेशनल’ स्मिथचे दिवसातील तिसऱ्याच चेंडूवर शतक, भारताविरुद्ध ठोकली नववी कसोटी शंभरी