लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकातच 107 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 29 धावा केल्या आहेत.
भारताची फलंदाजी जरी ढेपाळली असली तरी या सामन्यात अश्विनने एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 3000 धावांचा टप्पा पार केला आहे.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा आणि 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा चौथाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
त्याने या सामन्यात पहिल्या डावात 38 चेंडूत 29 धावा केल्या. त्याला जेम्स अँडरसनने बाद केले.
अश्विनने 5 जून 2010 ला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत 217 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25.10 च्या सरासरीने 3013 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना 27.16 च्या सरासरीने 525 विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा आणि 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणारे भारतीय क्रिकेटपटू:
9031 धावा, 687 विकेट – कपिल देव
3444 धावा, 956 विकेट – अनिल कुंबळे
3569 धावा, 711 विकेट – हरभजन सिंग
3013 धावा, 525 विकेट – आर अश्विन
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–यष्टीरक्षकाने झेल सोडला असतानाही गोलंदाजाने केले सेलिब्रेशन
–अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक
–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी