इंडियन प्रीमियर लीग २०२२चा (आयपीएल २०२२) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (२९ मे) १ लाखपेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. नवख्या गुजरातने त्यांच्या पहिल्याच आयपीएल हंगामात शानदार प्रदर्शन करत अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला आहे. तर राजस्थानने १४ वर्षांच्या अंतरानंतर अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दरम्यान उभय संघांच्या कर्णधारांची नावे एका खास यादीत सहभागी झाली आहेत.
गुजरातचा (Gujrat Titans) कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि राजस्थानचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) अंतिम सामन्यात (IPL 2022 Final) आमने सामने असतील. अशात कर्णधार म्हणून आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही दोघांचीही पहिलीच वेळ असेल. यासह त्या दोघांचे नाव आयपीएलच्या अंतिम सामन्यात नेतृत्त्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास यादीत सहभागी झाले आहे.
या यादीत एमएस धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा, विराट कोहलीपासून ते अनिल कुंबळे, सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर अशा आजी-माजी दिग्गज भारतीय खेळाडूंची नावे आहेत. यांपैकी धोनीने सर्वाधिक ९ वेळा अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.
आयपीएलचा अंतिम सामना खेळणारे भारतीय कर्णधार –
एमएस धोनी
अनिल कुंबळे
सचिन तेंडुलकर
गौतम गंभीर
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रेयस अय्यर
हार्दिक पंड्या*
संजू सॅमसन*
आयपीएलचा अंतिम सामना खेळणारे कर्णधार-
२००८: धोनी/वॉर्न
२००९: गिलख्रिस्ट/कुंबळे
२०१०: धोनी/सचिन
२०११: धोनी/डॅनियल व्हिटोरी
२०१२: गंभीर/धोनी
२०१३: धोनी/रोहित
२०१४: जॉर्ज बेली/गंभीर
२०१५: धोनी/रोहित
२०१६: कोहली/वॉर्नर
२०१७: रोहित/स्टिव्ह स्मिथ
२०१८: विलियम्सन/धोनी
२०१९: धोनी/रोहित
२०२०: श्रेयस अय्यर/रोहित
२०२१: मॉर्गन/धोनी
२०२२: हार्दिक/सॅमसन*
याखेरीज राजस्थान आणि गुजरात संघात होणारा आयपीएलचा अंतिम सामना हा असा पहिला अंतिम सामना असेल, ज्यामधील दोन्हीही कर्णधारांनी भारतीय संघाचे नेतृत्त्वपद भूषवलेले नाही, मात्र ते आयपीएल फ्रँचायझीचे संघनायक आहेत. अर्थात हार्दिक आणि सॅमसन हे असे पहिले कर्णधार आहेत, ज्यांच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव नसतानाही त्यांनी संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले आहे.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर से भी ऊपर! ख्रिस लिनचा गगनचुंबी षटकार, स्टेडियमबाहेरील घरात जाऊन पडला चेंडू- Video
‘बॅट बॅगमध्ये पॅक कर आणि कुटुंबासोबत वेळ घालव’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचा विराटला सल्ला
‘मला कधीच वाटले नव्हते…’, फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याबाबत काय म्हणाला गुजरातचा मॅचविनर खेळाडू?