लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकूनभारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. या डावात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा शतक झळकावण्यात अपयशी ठरला असला तरी देखील त्याने काही अप्रतिम शॉट खेळले. यासह त्याने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणार हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्येही रुजू झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने केएल राहुलसोबत मिळून शतकी भागीदारी केली. या दरम्यान त्याने ८३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या डावातील २५ वे षटक टाकण्यासाठी मार्क वूड गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्याच चेंडूवर रोहित शर्माने गगनचुंबी षटकार लगावला होता.
परंतु त्याला शतक पूर्ण करता आले नाही. त्याने या डावात ८३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावला
दिग्गज फलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान
रोहित शर्माने ५० धावांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर षटकार मारला होता. या षटकारासह त्याने दिग्गज भारतीय फलंदाज कपिल देव आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या यादीत प्रवेश केला आहे. लॉर्डसच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारणारा रोहित शर्मा ५ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कपिल देव, वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा आणि अजिंक्य रहाणे यांनी असा कारनामा केला होता. (Indian players who smashed six at lord’s ground in test cricket)
तसेच रोहितनंतर मोईन अलीला षटकार खेचत केएल राहुलही या यादीत सहभागी झाला आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारणारे भारतीय फलंदाज
१) कपिल देव
२)वीरेंद्र सेहवाग
३) आशिष नेहरा
४) अजिंक्य रहाणे
५) रोहित शर्मा
६) केएल राहुल
महत्त्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज
लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ
‘रा-रा’ जोडीची कमाल! शतकी भागिदारी करत तब्बल ४७ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला अंकुश