भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशचा निभाव लागला नाही, तर भारतीय फलंदाजांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली. तत्पूर्वी दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात संघातील अनेक खेळाडू रेकाॅर्ड्स रचताना दिसणार आहेत.
बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जर भारताने जिंकला तर भारत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी चौथा संघ बनू शकतो. वास्तविक, भारताने आतापर्यंत 580 पैकी 179 सामने जिंकले आहेत, दक्षिण आफ्रिकेनेही तितकेच कसोटी कसोटी सामने जिंकले आहेत. पण दुसरा कसोटी सामना जिंकून भारत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकेल आणि इतिहास रचेल.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दुसऱ्या कसोटीत 9 विकेट्स घेऊन नॅथन लायनला (Nathan Lyon) मागे टाकू शकतो. लायनने 129 कसोटीत 530 विकेट्स घेतल्या आहेत, तर अश्विनने 101 कसोटीत 522 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, अश्विन कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याच्या बाबतीत महान शेन वॉर्नला (37 वेळा) मागे टाकू शकतो. तो अजूनही बरोबरीवर आहे.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 300 कसोटी विकेट्सच्या जवळ आहे. कानपूरच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक विकेट घेताच तो कसोटीत 300 विकेट्स पूर्ण करेल. 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या भारत-बांगलादेश कसोटीच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ते दोन्ही संघांसाठी नवीन समस्या निर्माण करू शकते.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कानपूरमध्ये अवघ्या 35 धावा करून 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा चौथा खेळाडू ठरेल. त्याच्या नावावर आणखी दोन रेकाॅर्ड जमा होऊ शकतात. कोहली (सध्या 114 कसोटीत 8871) 9000 कसोटी धावांच्या जवळ आहे. मात्र, यासाठी त्याला मोठी शतकी खेळी खेळावी लागणार आहे. तसेच त्याच्या नावावर 114 कसोटींमध्ये 29 शतके आहेत. जर त्याने एक शतक झळकावले तर तो ऑस्ट्रेलियाच्या महान सर ब्रॅडमन (52 कसोटींमध्ये 29 शतके) पेक्षा जास्त शतके ठोकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याला शांत करावे लागेल” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य
दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; या खेळाडूला मिळाले स्थान
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टाॅप-5 संघ