मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी 231 धावांचे आव्हान आहे.
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असून तो जेव्हा चौकार मारत 34 धावांवर पोहचला तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत 1000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला.
ऑस्ट्रेलियामध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणारा तो भारताचा चौथाच क्रिकेटपटू आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे.
धोनीचा सध्या चालू असलेला वनडे सामना हा ऑस्ट्रेलियामधील 35 वा वनडे सामना आहे. त्याने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत या 1000 धावा करताना 7 अर्धशतके केली आहेत.
धोनीने या सामन्यात भारतीय कर्णधार विराट बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची रचली आहे. मात्र झे रिचर्डसनने विराटला 46 धावांवर बाद करत ही जोडी तोडली.
महत्त्वाच्या बातम्या-
–…आणि युजवेंद्र चहलने गुरजी रवी शास्त्रींचा २८ वर्षे जूना विक्रम मोडला
–इंग्लंड, श्रीलंकेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया विरुद्धही धोनीने केला तो मोठा कारनामा
–भारताकडून आज वनडे पदार्पण करणारा कोण आहे विजय शंकर…