---Advertisement---

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय रेल्वे महिला संघाची घोषणा, चार मराठी खेळाडूंची संघात वर्णी.

On: रविवार, जून 30, 2019 3:09 PM
---Advertisement---

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांकर बाग, पटना येथे ११ जुलै ते १४ जुलै २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

यास्पर्धेसाठी भारतीय महिला रेल्वे संघाच्या निवडीसाठी रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डकडून प्रशिक्षण सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जून ते ९ जुलै २०१९ दरम्यान दक्षिण-पूर्व रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने खरागपूर येथे भारतीय रेल्वे महिला कबड्डी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे.

शिबिरातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी अंतिम १२ खेळाडूंची भारतीय रेल्वे महिला संघात निवड करण्यात आली आहे. १२ पैकी ४ खेळाडु ह्या महाराष्ट्रातील आहेत. सोनाली शिंगटे, अपेक्षा टाकले, मीनल जाधव व रेखा सावंत या चार महाराष्ट्रातील खेळाडु भारतीय रेल्वेचा प्रतिनिधित्व करणार आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेत मागील तीन दशकापासून भारतीय रेल्वे महिला कबड्डी संघाचा दबदबा आहे. १९८४ पासून सलग विजेतेपद पटकवणाऱ्या रेल्वे संघाला ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघाने पराभूत करून भारतीय रेल्वे महिला संघाच्या विजेतेपदाची परंपरा खंडीत केली होती.

भारतीय रेल्वे अंतिम संघ: सोनाली शिंगटे (पश्चिम रेल्वे), मीनल जाधव (पश्चिम रेल्वे), अपेक्षा टाकले (मध्य रेल्वे), रेखा सावंत (मध्य रेल्वे), पूजा राणी (पूर्व रेल्वे), पायल चौधरी (दक्षिण-पूर्व रेल्वे),सीना (पूर्व-मध्य रेल्वे),पूजा (दक्षिण-मध्य रेल्वे), रितू नेगी (दक्षिण-मध्य रेल्वे), पिंकी रॉय (दक्षिण-मध्य रेल्वे), मोती चंदन (दक्षिण-मध्य रेल्वे), जे. पविथरा (दक्षिण-मध्य रेल्वे).

https://twitter.com/KhelKabaddiNews/status/1145290036000116740?s=19

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment