---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’

On: रविवार, जुलै 25, 2021 7:54 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा दिवस असून दिवसाच्या सुरुवातीलाच भारताच्या पदरी निराशा लागली आहे. भारतीय महिला नेमबाज मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल या १० मीटर एयर पिस्टलच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. परिणामी त्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवू शकल्या नाहीत.

मनु भाकरने पात्रता फेरीची चांगली सुरुवात केली होती. तिने सिरीज १ मध्ये ९८, सिरीज २ मध्ये ९५, सिरीज ३ मध्ये ९४ आणि सिरीज ४ मध्ये ९५ गुणांची नोंद केली होती. यानंतर पाचव्या सिरीजमध्ये ९८ गुणांची कमाई करत तिने नवव्या स्थानावर उडी घेतली होती. परंतु सहाव्या सिरीजमध्ये मात्र पिछाडीवर आली. त्यामुळे एकूण ५७५ गुणांसह ती पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर राहिली आणि तिला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला नाही.

दुसरीकडे यशस्विनी देसवाल ५७४ गुणांसह मनु भाकरनंतर १३ व्या स्थानापर्यंत मजल मारू शकली. तिने पहिल्या ४ सिरीजमध्ये अनुक्रमे ९४, ९८, ९४ आणि ९७ गुण नोंदवले होते. त्यानंतर तिला पाचव्या सिरीजमध्ये ९६ आणि सहाव्या सिरीजमध्ये ९५ गुण करता आले.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

टोकियो ऑलिंपिक: मेरी कोम अन् पीव्ही सिंधू यासारखे स्टार खेळाडू उतरणार मैदानावर; पाहा २५ जुलैचं पूर्ण वेळापत्रक

ऍथलिट्सला ‘गोल्ड’ मेडल जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचं रोख बक्षीस; मिराबाईच्या कोचला…

जेव्हा १२ व्या वर्षी मिराची ताकद पाहून भाऊही झाला होता हैराण; ट्रेनिंगसाठी करायची ६० किलोमीटरचा प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---