---Advertisement---

न्यूझीलंडला वनडेत व्हाईट वॉश देताच रोहितची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो आम्ही…’

On: बुधवार, जानेवारी 25, 2023 9:00 AM
Rohit-Sharma
---Advertisement---

इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना दिमाखात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडकडे व्हाईट वॉश टाळण्याची संधी होती, परंतु त्यांना संधीचं सोनं करण्यात अपयश आले. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने 90 धावांनी जिंकला. त्याचसोबत मालिकेवर 3-0ने आपले नाव कोरले. या विजयानंतर रोहित शर्मा याने मोठे भाष्य केले आहे. तसेच, त्याने भारतीय गोलंदाजांचे कौतुकही केले आहे.

नाणेफेक गमावत भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताने निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 385 धावा चोपल्या होत्या. तसेच, न्यूझीलंडपुढे 386 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडला हे आव्हान गाठता आले नाही. 41.2 षटकात सर्वच्या सर्व विकेट्स गमावत त्यांना फक्त 295 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 90 धावांनी खिशात घातला.

काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा (Rohit Sharma) यावेळी म्हणाला की, “मागील सहा वनडे सामन्यादरम्यान आम्ही अधिकतर चांगल्या गोष्टी केल्या आहेत. शेवटच्या वनडेत आम्ही बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ इच्छित होतो. आम्ही फलकावर धावा कुटल्या होत्या. मात्र, अशाप्रकारच्या मैदानावर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. आम्ही आमच्या योजनांवर कायम राहिलो.”

यावेळी रोहितने शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “शार्दुल मागील काही काळापासून सातत्याने भागीदारी भेदण्याचे काम करत आहे. संघातील काही लोक तर त्याला जादूगार म्हणतात. मी जेव्हा जेव्हा कुलदीपला चेंडू दिला आहे, तेव्हा तो विकेट घेऊन आला आहे.”

रोहितने सामन्यात 85 चेंडूत शतक साकारले. त्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “हे शतक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी मोठी खेळी करणे आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाणे महत्त्वपूर्ण होते.” तसेच, वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचण्याच्या प्रश्नावर तो म्हणला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर आम्ही रँकिंगबाबत चर्चा करत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटी आव्हान सोपे नसेल. मात्र, आम्ही त्यासाठी तयार आहोत.”

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेनंतर टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे खेळला जाणार आहे. (indian skipper rohit sharma reaction after series win against new zealand)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात सव्वा तेरा कोटी मिळालेला ‘मिलेनियर’ ब्रुक म्हणतोय, “मी पैश्यांसाठी…”
राशिदची आणखी एक करामत! अवघ्या 24 व्या वर्षी गाठला 500 बळींचा टप्पा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---