भारतीय क्रिकेट संघाने नुकताच झिम्बाब्वे दौरा केला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने यजमान संघाचा ३-० असा पराभव केला. झिम्बाब्वेने या संपूर्ण मालिकेत तितकी उत्कृष्ट कामगिरी केली नसली तरी, काही खेळाडूंनी आपली दखल घेण्यास नक्कीच भाग पाडले. मात्र, त्याचवेळी भारताचा अनुभवी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने भारत आणि झिम्बाब्वे क्रिकेटमधील विषमतेच्या दरीची सर्वांना जाणीव करून दिली आहे.
रविचंद्रन अश्विन हा सातत्याने सोशल मीडियावरून तसेच मुलाखतीतून अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य करत असतो. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने भारतीय क्रिकेट व झिम्बाब्वे क्रिकेट यांच्यात किती आर्थिक विषमता आहे हे सर्वांसमोर आणले. अश्विन म्हणाला,
“मी नुकताच एक क्रिकेट विषयक लेख वाचला. त्यात असे दिसून येत आहे की भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे कशाप्रकारे अधिक श्रीमंत आहेत. दुसरीकडे झिम्बाब्वेला यांची बरोबरी करण्यासाठी खूप वर्ष जावे लागतील. मी वाचले की, नुकताच झिम्बाब्वे दौऱ्यावर वॉशिंग्टन सुंदरचा बदली खेळाडू म्हणून गेलेल्या शाहबाज अहमद याची आयपीएलमधील बेस प्राईस ही झिम्बाब्वेतील प्रमुख टी२० लीगपेक्षा कितीतरी अधिक आहे.”
“आता अहमद याला आरसीबीसाठी खेळण्याची किती रुपये मिळतात हे मला माहीत नाही. मात्र, त्याची बोली २० लाखापासून सुरू झालेली. त्याचवेळी झिम्बाब्वेतील नॅशनल प्रीमियर लीग विजेत्या संघाला भारतीय रुपयात ८ लाख रुपये दिले जातात. ही नक्कीच चिंता वाढवणारी गोष्ट आहे”
अखेर अश्विनने हे देखील सांगितले की, भारताविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर झिम्बाब्वे संघाला त्याचा फायदाच होणार आहे.
अश्विन सध्या विश्रांतीवर आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! भारत पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेचाही प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर
‘त्याची उणीव जाणवणार नाही’, बुमराहच्या अनुपस्थितीबाबत माजी दिग्गजाचे मोठे विधान
आशिया चषकादरम्यान ‘हे’ भारतीय दिग्गज करतील हिंदी भाषिकांचे मनोरंजन, पाहा संपूर्ण यादी