भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध 13 जुलैपासून एकदिवसीय सामन्याची मालिका खेळायची आहे. मागील काही दिवसांपासून चहलने उत्कृष्ट कामगिरी केली नाही. त्यामुळे चहलसाठी हा दौरा एखाद्या परिक्षेपेक्षा कमी नाही. अगामी टी 20 विश्वचषक लक्षात घेता चहल जवळ ही शेवटची संधी आहे. अशा परिस्थितीमध्ये या मालिकेत चहलला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
युजवेंद्र चहलला या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचा आत्मविश्वास आहे. त्याचबरोबर तो श्रीलंका संघाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचा त्याने विश्वास व्यक्त केला आहे.
युजवेंद्र चहलने आभासी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, ‘माझ्या गोलंदाजीमध्ये असे काही विविधता आहेत आणि मी फक्त त्यांच्यावरच लक्ष देणार आहे. इतर चेंडूवर लक्ष देणार नाही. या मालिकेत आपल्याला अधिक आत्मविश्वास असलेला चहल दिसेल. मी फक्त माझ्या अँगलवर काम करत आहे आणि अधिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील करत आहे.’
त्याचबरोबर चहल पुढे म्हणाला की, “मला नाही वाटत की माझी कामगिरी खराब होत चालली आहे. आपण प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करू शकता असे नाही. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करणार आहे. ही मालिका माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”
युजवेंद्र चहलने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर तो आता श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये 13 जुलै पासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टी20 मालिका होईल. भारताच्या या श्रीलंका दौऱ्याचा शेवट 25 जुलैला होणार आहे. या दौऱ्यात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद शिखर धवनला दिले आहे. तर या संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आहे. तर प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड या संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, राहुल चाहर, दीपक चाहर, कुलदीप यादव, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जर धोनी पुढील आयपीएल हंगाम खेळणार नसेल, तर मीही खेळणार नाही’, सुरेश रैनाचे चकीत करणारे भाष्य
“राहुल द्रविडने भारताचा पूर्णवेळ प्रशिक्षक होऊ नये”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचे मत