टोकियो ऑलिंपिक २०२० मधील रविवारचा (०१ ऑगस्ट) दिवस भारतासाठी अतिशय खास राहिला. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कांस्यपदक जिंकत भारताची मान उंचावली. तर पुरुषांच्या हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय मिळवत १९७२ नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली. यानंतर धावपटू द्युती चंद हिच्याकडून सर्वांना अपेक्षा होत्या. मात्र तिने भारतीय क्रिडाप्रेमींना निराश केले आहे.
सोमवारी (०२ जुलै) महिलांची २०० मीटर हीट ४ शर्यत पार पडली. या शर्यतीत भारतीय धावपटू द्युती चंदला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. तिला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
द्युतीने केवळ २३.८५ सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली. हा तिचा या हंगामातील सर्वोत्कृष्ट वेळ राहिला. तरीही ती हीट ४ शर्यतीत सातव्या स्थानावर राहिली आणि उपांत्य फेरीत पात्र होऊ शकली नाही.
#Olympics | Sprinter Dutee Chand finishes 7th in women's 200m heat 4, fails to advance to the semi-finals.
(File photo) pic.twitter.com/Dq0eW1Vbih
— ANI (@ANI) August 2, 2021
महिलांच्या २०० मीटर हीट ४ शर्यतीत टॉप-३ मध्ये येणाऱ्या धावपटू उपांत्य फेरीत प्रवेश करू शकल्या आहेत. यामध्ये नामीबियाची मबोमा प्रथम स्थानी आहे. तिने २२.११ सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली होती.
द्युती चंदला अर्जुन अवॉर्डने गौरवण्यात आले होते. याव्यतिरिक्त तिने एशियन गेम्स २०१८ मध्ये रौप्य पदकावरही आपले नाव कोरले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
कमालच ना! टोकियो ऑलिंपिकमध्ये या खेळाडूने जिंकली तब्बल ७ पदकं