---Advertisement---

ब्रेकिंग! आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 साठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वपद

On: शनिवार, मे 2, 2026 5:21 PM
---Advertisement---

आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट मंडळाने शनिवारी (२ मे) भारतीय संघ जाहीर केला आहे. १२ जूनपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. यासाठी भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचे आणखी एक आयसीसी विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

या स्पर्धेत पाचव्यांदा नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीतबरोबर फलंदाजीमध्ये स्म्रीती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंची साथ मिळेल, तर गोलंदाजीची जबाबदारी प्रामुख्याने दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग यांच्यावर असेल.

या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून त्यामध्ये नेदरलॅंड्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि पाकिस्तान हे पण संघ आहेत. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना १४ जूनला पाकिस्तानविरुद्ध आहे. पुढील साखळी सामना अर्थातच दुसरा सामना १७ जूनला नेदरलॅंड्सविरुद्ध, तिसरा सामना २१ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, चौथा सामना २५ जूनला बांग्लादेशविरुद्ध आणि पाचवा सामना २८ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी, यस्तिका भाटीया (विकेटकीपर), नंदनी शर्मा, अरुधंती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर, क्रांती गौड, श्रेयांका पाटील आणि राधा यादव.

टी२० विश्वचषक २०२६ आधी भारत तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीही वरील संघच निश्चित आहे. विश्वचषकाची अंतिम तयारी म्हणून ही मालिका महत्त्वपूर्ण असणार आहे. २०२४ मध्ये भारत साखळी फेरीतूनच बाहेर झाला होता. यामुळे यंदा त्यामध्ये सुधारणा करत संघाचा विश्वविजेते बनण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२० सामना – २८ मे, चेम्सफोर्ड
दुसरी टी२० सामना – ३० मे, ब्रिस्टल
तिसरा टी२० सामना – २ जून, टाँटन

भारताचे टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक –
१४ जून – विरुद्ध पाकिस्तान, एजबस्टन
१७ जून – विरुद्ध नेदरलँड्स, लीड्स
२१ जून – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर
२५ जून – विरुद्ध बांगलादेश, मँचेस्टर
२८ जून – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---