भारतीय स्क्वॅश संघ अधिकृत प्रशिक्षकाविनाच पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडोनेशिया एशियन गेम्समध्ये सहभागी होणार आहे.
स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसआरएफआय)ला एशियन गेम्स तोंडावर आल्या असून सुद्धा राष्ट्रीय प्रशिक्षक मिळाला नाही.
याआधी इजिप्तचे अचराफ अल करारगुई हे भारतीय स्क्वॅश संघाचे प्रशिक्षक होते. करारगुई यांनी एसआरएफआय यांच्याशी झालेल्या वादामुळे तातडीने पदत्याग केला.
भारतीय स्क्वॅशचे अव्वल खेळाडू सौरव घोसल आणि जोशना चिनप्पा हे खाजगी प्रशिक्षकांसोबत सराव करत आहे. तर दिपिका पल्लिकल ही करारगुई यांच्या प्रशिक्षणाखाली सराव करण्यास इजिप्तला गेली आहे.
“खेळाडू जरी त्यांच्या वेगवेगळ्या प्रशिक्षकांसोबत सराव करत असले तरी एशियन गेम्ससारख्या स्पर्धेसाठी पुर्ण संघाने सोबत सराव केला तर उत्तम आहे”, असे घोसलने म्हटले आहे.
“करारगुई यांच्या जागी अजून कोणालाही नेमण्यात आले नाही ही खूप निराशेची बाब आहे”, असेही तो पुढे म्हणाला.
घोसाल हा जागतिक क्रमवारीत 12व्या क्रमांकावर आहे. करारगुई यांच्या जाण्याने त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील अमेरिकेच्या माजी स्क्वॅशपटू डेव्हीड पॅलमेर यांच्या प्रशिक्षणाखाली सराव केला आहे.
तर सायरस पोंचा हे आधी पासूनच कागदोपत्री राष्ट्रीय प्रशिक्षक आहे परंतु सगळे हक्क हे विदेशी प्रशिक्षकाकडेच असतात. पोंचा आणि भुवनेश्वरी कुमारी हे संघासोबत जकार्ता येथे जाणार आहेत.
भारतीय स्क्वॅश संघ– सौरव घोसल, दिपिका पल्लिकल, संधू, जोशना चिनप्पा, तन्वी खन्ना, रमित टंडन, महेश मानगावकर, सुनाया कुरूविल्ला
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रोएशियन फुटबॉल संघाच्या या कृत्याने जिंकली जगभरातील चाहत्यांची मने
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला