भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेटपटू शुक्रवारी (21 ऑगस्ट) लीड्सला रवाना झाले आहेत. त्यानंतर सर्व क्रिकेटपटू शनिवारी हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर पहिल्या सराव सत्रात सहभागी होतील. प्रवासादरम्यानचे फोटो खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव तिसऱ्या कसोटीत संभाव्य अकरामध्ये निवडण्यासाठी उपलब्ध असतील. यापूर्वी, त्यांना विलगीकरणात ठेवल्यामुळे दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ते भाग घेऊ शकले नव्हते. मात्र शॉ आणि यादव यांनी त्यांचा विलगिकरनाचा कालावधी पूर्ण केला आहे. हे दोन्ही खेळाडू लॉर्ड्स कसोटी दरम्यान भारतीय संघाच्या जैव सुरक्षित वातावरणात सहभागी झाले होते. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी दोघेही खेळाडू उपलब्ध असतील. शॉ आणि यादव दोघेही 3 ऑगस्ट रोजी कोलंबोहून इंग्लंडला आले होते.त्यामुळे नियमांनुसार त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
भारताच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या रविचंद्रन अश्विनला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. लॉर्ड्स कसोटी सामन्यात संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर अश्विनसाठी अंतिम अकरामध्ये स्थान मिळवणे थोडे कठीण झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाने कोणत्याही बदलाशिवाय तिसरा कसोटी सामना खेळला तर, अश्विनला संघात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते.
https://www.instagram.com/p/CSy8bFVIxvL/?utm_source=ig_web_button_share_sheet
तर दुसरीकडे या सामन्यासाठी इंग्लंड संघाने मोठे बदल केले आहेत. रोरी बर्न्स आता लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळलेल्या हसीब हमीदसोबत सलामीला दिसणार आहे. सलामीवीर डोम सीबली आता तिसऱ्या कसोटीत बाहेर बसणार आहे. त्याचबरोबर जगातील प्रथम क्रमांकाचा टी20 फलंदाज डेविड मलानला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणार आहे. तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार जो रूट कायम असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेली दुसरी कसोटी ही इंग्लंड खेळाडूंच्या स्लेजिंगमुळे चर्चेत राहिली. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना कसे प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
हेडिंग्ले कसोटीत जडेजाचे बाहेर होणे निश्चित, ‘ही’ कारणे अश्विनला संधी देण्यास भाग पाडणार!
जबरा सेलिब्रेशनचे जबरा चाहते! मोहम्मद सिराजच्या विशेष जल्लोषाचे हैदराबादमध्ये भलेमोठे कट-आऊट
हे पोरगं गजब आहे! पंतचे चक्क इंग्लंडकडून यष्टीरक्षण; समालोचक म्हणे, ‘उभ्या आयुष्यात असं पाहिलं नाही’