भारत विरुद्ध न्यूझीलंड संघामध्ये नुकताच टी २० मालिका संपन्न झाली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. आता भारतीय संघासमोर कसोटी मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर पासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानावर कसून मेहनत करताना दिसून येत आहेत. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पहिल्या फोटोमध्ये संघातील सर्व खेळाडू दिसून येत आहेत, तर दुसऱ्या फोटो मध्ये मोहम्मद सिराज, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव धावताना दिसून येत आहे. पुढील फोटोमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला सल्ला देताना दिसून येत आहेत. तसेच आणखी एका फोटोमध्ये आर अश्विन गोलंदाजीचा आणि अक्षर पटेल हिटिंगचा सराव करताना दिसून येत आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. कारण नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या कसोटीनंतर ३ डिसेंबरपासून मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली पुनरागमन करणार आहे.
— BCCI (@BCCI) November 23, 2021
मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का
न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत केएल राहुल डावाची सुरुवात करणार होता. परंतु, मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले आहे. आता तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. (विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.)
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाज ठरले फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या डावात वर्चस्व
गांजा पिल्याने गावसकरांच्या मित्राचे झालेले निलंबन, केले होते अविस्मरणीय पुनरागमन