भारतीय क्रिकेट संघच्या जेर्सीवर आता ओप्पो स्मार्टफोन चे नाव असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावामध्ये ओप्पोने बाजी मारत ‘रिलायन्स’,’पेटीएम’, ‘विवो’ ह्यांच्यापेक्ष्या अधिक बोली लावत मुख्य पुरस्कर्ते म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली.
सध्या स्पोन्सोर असलेया ‘स्टारचा’ कालावधी मार्चअखेर संपणार आहे. ओप्पो एप्रिल महिन्यापासून कार्यभार सांभाळेल व ते ५ वर्षांपर्यंत चालू राहील. ओप्पोने १०७ कोटी रुपये एवढी बोली लावली व आपले स्पर्धक विवो पेक्षा तब्बल ३० कोटी रुपये अधिक बोली लावली. भारतच्या सर्व क्रिकेट संघाच्या जर्सीवर म्हणजेच सिनीयर, जुनियर, महिला व पुरुष यांच्या जर्सीवर ‘ओप्पो’ हे नाव दिसेल.
भारतीय संघाचे आधीचे पुरस्कर्ते:
१. विल्स
२. सहारा
३. स्टार
सध्या चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर पुढचा अंतराष्ट्रीय सामना हा थेट इंग्लंडला जून मध्ये असणार आहे. आयसीसी चाम्पियंस ट्रोफी जून मध्ये सुरु होणार आहे तेव्हा आपल्याला ‘ओप्पो’ हे नाव जर्सीवर पाहता येईल. ही मालिका संपली की एप्रिल-मे मध्ये आयपीएल सुरु होणार आहे जेव्हा भरताचा कोणताही अंतराष्ट्रीय दौरा नाही.