सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील कसोटी सामन्याची सुरुवात बुधवारपासून (दि.14 डिसेंबर) होणार आहे. मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जाणार आहे. तसेच दुसरा सामना 22 ते 26 डिसेंबर यादरम्यान ढाका येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघासाठी ही मालिका यावर्षीची शेवटची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्न करतील. पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी सफेद जर्सीमध्ये फोटोशूट केला. खेळाडूंचा हाच फोटोशूट सोशल मिडीयावर पसंत केला जातोय.
बांगलादेश संघाने भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0ने पराभूत करण्याचा इतिहास रचत मालिका आपल्या नावावर केली. यजमान संघ कसोटी मालिकेत देखील आपले प्रदर्शन असेच सुरु ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच ही कसोटी मालिका 2-0ने जिंकण्याच्या भारतीय संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे.
Photoshoot session of team India. pic.twitter.com/NPwkFtltt2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 13, 2022
बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यात भारत ‘अजिंक्य’
भारतीय संघाचा बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यातील रेकॉर्ड धमाकेदार आहे. भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ कसोटी प्रकारात एकूण 11 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने 9 सामने जिंकले असून 2 सामने अनिर्णित राहिले. बांगलादेशमध्ये भारतीय संघाने एकूण 8 सामने खेळले, ज्यात भारताने 6 सामन्यात विजय मिळवला.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवली जाणारी ही मालिका भारतासाठी महत्वाची आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची भारताची अपेक्षा आहे. भारताचे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धचे 6 सामने अजून बाकी आहेत. यातील दोन सामने बांगलादेश विरुद्ध आहे, तर 4 सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारताला सर्व सामने जिंकावे लागतील. या सामन्यांपैकी एका जरी सामन्यात भारताचा पराभव झाला तर भारत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: टायब्रेकरमध्ये विजय मिळवत थलायवाज उपांत्य फेरीत; बेंगलोरनेही मारली बाजी
बीसीसीआयचा अनागोंदी कारभार! उनाडकत अजून भारतातच; पुनरागमन लांबणीवर