बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने मंगळवारी (11 जुलै) टी-20 मालिका खिशात घातली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने 8 धावांनी विजय मिळवला आणि मालिका देखील नावावर केली. दीप्ती शर्मा सामनावीर ठरली, जिने 12 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या.
मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणे मंगळवारी झालेला दुसरा सामना देखील कमी धावसंख्येचा होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 95 धावांपर्यंत मजल मारू शखला. भारताच्या वरच्या आणी मधल्या फळीतील फलंदाजांचे प्रदर्शन लाजिरवाणे राहिले. प्रत्युत्तरात बांगलादेश मायदेशातील या सामन्यात सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. पण बांगलादेश संघासाठीही त्यांची एकही फलंदाज अर्धशतक करू शकली नाही. परिणामी बांगलादेश संघ अवघ्या 87 धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतील पहिला सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्यांना 8 धावांनी विजय मिळला.
उभय संघांतील हा मंगळवारी खेळला गेलेला सामना मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर पार पडला. खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे फलंदाज एकापाठोपाट विकेट्स गमावता दिसल्या. बांगलादेशसाठी सुलताना खातून हिने तीन विकेट्स घेतल्या. तर फाहिमा खातूनने 2 विकेट्स घेतल्या. मारूफ अख्तर, नहिदा अख्तर आणि राबिया खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारताच्या विजयात दीप्ती शर्मा हिच्यासह शेफाली वर्माचे योगदान सर्वाधिक राहिले. या दोघांनी अनुक्रमे 12 आणि 15 धावा खर्च करून प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. मिन्नू मनी हिने दोन विकेट्स घेतल्या, तर बरेड्डी अनुषा हिला एक विकेट मिळाली.
बांदालादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (13 जुलै) खेळला जाणार आहे. टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिाक 16 जुलैपासून सुरू होईल. (Indian team won the second T20 match against Bangladesh)
महत्वाच्या बातम्या –
KL Rahul । चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! सलामीवीर फलंदाज लवकरच करणार पुनरागमन
ICC Ranking । टॉप 10मध्ये हरमनप्रीने पुन्हा मिळवेल स्थान! ‘या’ आहेत सर्वोत्तम 5 फलंदाज