---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, बुमराहची उपकर्णधारपदी निवड

india-test-team
---Advertisement---

भारताचा संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळतो आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकांसाठी संघ जाहीर केले आहेत.

मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच टी२० संघाच्या उपकर्णधारपदीही त्याचीच निवड करण्यात आली आहे.

निवड समितीने अनुभवी भारतीय खेळाडू अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. कारण निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी या खेळाडूंना पूर्वसूचना दिली होती की, त्यांना श्रीलंकेविरुद्ध निवडले जाणार नाही. कारण निवड समितीची इच्छा आहे की, या चारही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून त्यांचा फॉर्म सुधारावा.

जरी भारताच्या या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध संधी मिळाली नसली, तरीही सौरभ कुमार या नव्या चेहऱ्याला कसोटी संघात जागा मिळाली आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भारत अ संघाचा भाग होता. तसेच भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळ यालाही संघात स्थान मिळाले आहे.

याशिवाय विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर अष्टपैलू शार्दुल ठाकूर कसोटी आणि टी२० मालिका, दोन्हीतही विश्रांतीवर असेल.

श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार

श्रीलंकेचा भारत दौरा-
टी२० मालिका
२४ फेब्रुवारी – पहिली टी२०, लखनऊ
२६ फेब्रुवारी – दुसरी टी२०, धरमशाला
२७ फेब्रुवारी – तिसरा टी२०, धरमशाला

कसोटी मालिका
४-८ मार्च – पहिली कसोटी, मोहाली
१२-१६ मार्च – दुसरी कसोटी, बेंगळुरू (दिवस-रात्र)

महत्त्वाच्या बातम्या-

रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम

ब्रेकिंग! वनडे, टी२० नंतर कसोटीच्याही नेतृत्त्वाचा मुकूट रोहितच्याच डोक्यावर, संघाचीही झाली घोषणा

विराटने सोडली ‘टीम इंडिया’ची साथ! मालिकेच्या अर्ध्यातून परतला घरी; वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---