वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (icc under 19 world cup) थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी (२२ जानेवारी) भारत आणि युगांडा (India under19 vs Uganda under 19) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांनी युगांडा संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यासह हा सामना ३२६ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
भारतीय १९ वर्षाखालील संघाने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेत सलग ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच विजयाची हॅट्ट्रिक करत भारतीय संघाने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघावर जोरदार विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंड संघावर जोरदार विजय मिळवला होता.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
भारतीय संघाने उभारला ४०५ धावांचा डोंगर
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, युंगांडा संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना राज बावाने १०८ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने १६२ धावांची खेळी केली. तर अंगक्रिश रघुवंशीने १२० चेंडूंमध्ये २२ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने १४४ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून द्विशतकी भागीदारी करत शिखर धवनचा १८ वर्ष जुना विक्रम मोडून काढला. या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात ४०५ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.
All Over: Yet another comprehensive victory for India U19 as they beat Uganda U19 by a massive 326 runs in their final Group B game.
Nishant Sindhu takes 4/19. Earlier, Raj Bawa smashed 162 * & A Raghuvanshi scored 144 #BoysInBlue #U19CWC
Details ▶️ https://t.co/7xCHB938Wc pic.twitter.com/4K9UypsjOf
— BCCI (@BCCI) January 22, 2022
भारतीय संघाने मिळवला ३२६ धावांनी विजय
भारतीय संघाने युगांडा संघासमोर ४०६ धावांचे लक्ष्य दिले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना युगांडा संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. युगांडा संघाकडून पास्कल मुरुंगीने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर रोनाल्ड ओपियोने ११ धावांचे योगदान दिले. या संघातील ६ फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले होते.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना निशांत सिंधूने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर राजवर्धन हंगरगेकरने २ गडी बाद केले. या दमदार गोलंदाजीच्या जोरावर युगांडा संघाचा डाव अवघ्या ७९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ३२६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
नमन ओझाची झंझावाती शतकी खेळी; लिजेंड्स लीगचा पहिला शतकवीर होण्याचा मिळविला मान
राज बावाने तोडला धवनचा १८ वर्ष जुना विश्वविक्रम! युवराजशी आहे खास नाते
हे नक्की पाहा: