वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी20 मालिकेत भारतीय संघ सलग दोन पराभवामुळे पिछाडीवर पडला आहे. या मालिकेत भारतीय संघाचे उपकर्णधारपद सूर्यकुमार यादव यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र, तोदेखील मालिकेतील या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. अशात त्याच्या या खराब कामगिरीचे कारण उपकर्णधारपद असल्याचा तर्क लावला जातोय.
मागील काही मालिकांमध्ये सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचे उपकर्णधार म्हणून भूमिका बजावताना दिसला. रोहित शर्मा टी20 संघाचा भाग नसल्याने संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करतो. तर, सूर्यकुमार उपकर्णधार बनला आहे. मात्र, टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार याला ही जबाबदारी मिळाल्यापासून फरशी चांगली कामगिरी करता आली नाही.
विशेष म्हणजे भारतीय संघाचे उपकर्णधार मिळाल्यानंतर खेळाडू अपेक्षित कामगिरी करताना दिसले नाहीत. यापूर्वी केएल राहुल हा टी20 संघाचा उपकर्णधार होता. तो देखील सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे टी20 संघातून बाहेर फेकला गेला. सध्या दुखापतींमुळे तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपली तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यानंतर हार्दिक पांड्या याच्याकडे देखील मागील वर्षी ही जबाबदारी देण्यात आलेली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधारपद स्वीकारल्यानंतर दोन सामन्यात केवळ नऊ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार झाल्यानंतर खेळाडू अपयशी ठरतात, असे बोलले जातेय.
सूर्यकुमार याला आपल्या या खराब कामगिरीतून उभारण्याची संधी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यात मिळेल.
(Indian Vice Captain Failed In Batting After Choosen Suryakumar Yadav Flop)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी