भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून संघाला त्याठिकाणी एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाणार असून पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ जुलैपासून सुरू होईल. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्दिक या टी-२० मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. तत्पूर्वी कार्तिकने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतही दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारताचे नेतृत्व करत होता. ही टी-२० मालिका संपल्यानंतर त्याला काही काळाची विश्रांती दिली गेली, ज्याचा त्याने पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. कार्तिकने हा मोकळा वेळ त्याच्या कुटुंबीयांसोबत घालवला. त्याने मगंळवारी (२६ जुलै) स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक खास पोस्ट केली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये कार्तिकसोबत त्याची दोन जुळी मुळे दिसत आहेत.
कार्तिकने शेअर केलेल्या या पोस्टला एक खास कॅप्शन देखील दिले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “आपल्या घरी कुटुंबासोबत तुम्हाला जो थोडासा वेळ मिळतो, त्यालाच तुम्ही आनंद म्हणता. आता पुन्हा कामावर परतण्याची वेळ झाली आहे.”
https://www.instagram.com/p/CgeYzrKpXA8/?utm_source=ig_web_copy_link
कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकलने मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला होता. दीपिकासोबत लग्ना झाल्यानंतर कार्तिकच्या प्रदर्शात विशेषतः सुधारणा झाल्याचे दिसले आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठीही जबरदस्त प्रदर्शन केले. हंगामात त्याचा स्ट्राईक रेटही अप्रतिम होता. मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर असलेल्या कार्तिकला त्याचे आयपीएल २०२२ मधील प्रदर्शन पाहून निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा संघात खेळण्याची संधी दिली. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात देखील कार्तिक भारताचे प्रतिनिधित्व करेल, अशी दाट शक्यता आहे.