भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या पुनर्निधारीत कसोटी सामन्यात पंतची बॅट आग ओकताना दिसत आहे. त्याने भारताकडून पहिल्या डावात शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात दमदार अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
भारताच्या (Team India) दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पंतने चेतेश्वर पुजाराला साथीला घेत संघाचा डाव पुढे नेला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी झाली. पंतने (Rishabh Pant) पुढे त्याचे वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. ८६ चेंडू खेळताना ८ चौकारांच्या मदतीने त्याने ५७ धावांची (Rishabh Pant Half Century) खेळी केली. तत्पूर्वी पहिल्या डावात त्याने शतक झळकावले होते. १११ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि २० चौकारांच्या मदतीने त्याने १४६ धावांची (Rishabh Pant Century) जबरदस्त खेळी खेळली होती.
तब्बल ४९ वर्षांनंतर कोणत्या यष्टीरक्षकाने केलीय ही किमया
अशाप्रकारे एका कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतक करण्याचा प्रशंसनीय विक्रम पंतने आपल्या नावावर केला आहे. तो हा पराक्रम करणारा केवळ दुसराच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. तब्बल ४९ वर्षांनंतर कोणत्या यष्टीरक्षकाने भारताकडून खेळताना ही कामगिरी केली आहे. त्याच्यापूर्वी फारुख इंजिनियर यांनी इंग्लंडविरुद्धच हा पराक्रम केला होता. १९७३ मध्ये मुंबई येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंजिनियर यांनी पहिल्या डावात १२१ आणि दुसऱ्या डावात ६६ धावांची खेळी केली होती.
एमएस धोनीचीही केली बरोबरी
याखेरीज पंतने भारताच्या महान यष्टीरक्षकांमध्ये गणल्या जाणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याचीही एका विक्रमात बरोबरी केली आहे. इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळताना दोन्हीही डावात अर्धशतक करण्याचा पराक्रम त्याने केला आहे. योगायोग असा की, भारताच्या या दोन्हीही यष्टीरक्षकांनी बर्मिघमच्या मैदानावरच ही कामगिरी केली आहे. पंतपूर्वी धोनीनेही २०११ मध्ये बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर खेळताना कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७७ आणि दुसऱ्या डावात नाबाद ७४ धावा फटकावल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाचवी कसोटी संपण्यापूर्वी सिराज भावूक; म्हणाला, ‘इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय अविस्मरणीय..’
चेंडूच ‘असा’ होता की…, पाहा विराटच्या सपोर्टमध्ये काय म्हणाला इंग्लंडचा माजी फिरकीपटू
‘बर्मी आर्मी’ने विराटला पुन्हा हिणवले! यावेळी चिडवण्यासाठी ‘चीरियो’चा वापर