भारताची कर्णधार मिताली राजच ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. याबद्दल तिनेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध करून माहिती दिली आहे.
सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक खेळण्यासाठी गेला असून भारतीय कर्णधार मिताली राजने पहिल्याच सामन्यात जबदस्त कामगिरी केली आहे. ४ दिवसांपर्यन्त मितालीच अकाउंट हे वेरिफाइड झालेलं नव्हतं. ते अचानक परवा पासून वेरिफाइड दिसायला लागलं. परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मितालीच्या अकाउंटवरून रिप्लाय येऊ लागले.
मितालीला बऱ्याच पोस्टमध्ये आयसीसी तसेच अन्य दिग्गजांनी याच आयडीचा वापर करून शुभेच्छा दिल्या होत्या. काल रात्री मितालीने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून अकाउंट हॅक झाल्याचं सांगितलं.
त्यात मिताली म्हणते, ” माझं अधिकृत ट्विटर अकाउंट M_Raj03 हे हॅक झालं आहे. जोपर्यंत माझ्याकडून काही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत सर्व ट्विटकडे दुर्लक्ष करा. ”
https://www.instagram.com/p/BVz3rVkA75a/?taken-by=mithaliraj&hl=en
मितालीच अकाउंट हॅक झालं असल्याचं ट्विट भारतीय क्रिकेटपटू वेद कृष्णमूर्थीने सुद्धा केला आहे.
Hey guys the official twitter handle of Mithali raj @M_Raj03 has been hacked !! Kindly ignore the msgs and tweets until confirmation!!
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) June 26, 2017
दुसऱ्या ट्विटमध्ये वेद कृष्णमूर्थी म्हणते, “हे पहा मिताली माझ्या समोर बसली आहे आणि तिने मला ब्लॉक केलं आहे. हा प्रॉब्लेम लवकर सोडवा. ”
N there you u go I hav blocked , with Mithali raj herself sitting next to me 😂😂@TwitterIndia plzz get to this asap !!! pic.twitter.com/bKxlBxVeX7
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) June 26, 2017
तर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने मितालीच अकाउंट हॅक झालं असा ट्विट केला त्याला M_Raj03 अकाउंटवरून आता सर्व ठीक झाले आहे असा रिप्लाय आला आहे.
Sorry for all the trouble. The account has been restored. Hope there was no inconvenience caused.
— Mithali Raj (@M_Raj03) June 26, 2017