---Advertisement---

भारताची विजयी सलामी, पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेला ४ विकेट्सने झुकवत मालिकेत १-०ने आघाडी

On: शनिवार, जुलै 2, 2022 9:32 AM
Indian-Women
---Advertisement---

टी२० मालिकेनंतर वनडे मालिकेतही भारतीय महिला संघाने त्यांचे दमदार प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी (०१ जुलै) पल्लेकेले येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. दीप्ती शर्मा हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४ विकेट्सने हा सामना जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ही मालिका आयसीसीच्या वनडे चँपियनशीप स्पर्धेचा भाग आहे. 

या सामन्यात (IND vs SL) श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४८.२ षटकात १७१ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३८ षटकातच ६ विकेट्सच्या नुकसानावर श्रीलंकेचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना नावावर केला.

श्रीलंकेच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) कर्णधार खेळी केली. तिने ६३ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. तसेच हरलीन डेओलने ३४ धावांची खेळी केली. शेफाली वर्मा (३५ धावा) आणि दिप्ती शर्मा (२२ धावा) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. तसेच पूजा वस्त्राकारनेही १९ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले.

या डावात श्रीलंकेकडून इनोका रणवीरा हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ओशादी रणशिंगे हिनेही २ विकेट्सचे योगदान दिले.

तत्पूर्वी  श्रीलंका संघाकडून नीलाक्षी डी सिल्वा हिने सर्वाधिक धावा केल्या होत्या. ६३ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने तीने ४३ धावांची खेळी खेळली होती. तसेच हसीनी पेरेरा हिने ३७ धावा जोडल्या होत्या. हर्षिता माधवी (२८ धावा), अनुष्का संजीवनी (१८ धावा) यांनीही थोडेफार योगदान दिले होते.

या डावात भारताकडून रेणुका सिंग हिने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दीप्ती शर्मानेही (Deepti Sharma) श्रीलंकेच्या ३ फलंदाजांता तंबूचा रस्ता दाखवला होता. पूजा वस्त्राकारनेही २ फलंदाजांना बाद केले होते. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि राजश्री गायकवाड यांनी प्रत्येकी एक विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला सर्वबाद करण्यात हातभार लावला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारताचा सोपा विजय, डर्बीशायरला ७ विकेट्सने केले पराभूत

जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा

पंतच्या शतकाने सावरला डाव, जडेजाही सेंच्यूरीच्या नजीक; भारताच्या पहिल्या दिवसाखेर ७ बाद ३३८ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---