हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी लंडनला रवाना झाला, जिथे तो आगामी राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये भाग घेईल. २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोससह अ गटात स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष क्रिकेटला स्थान देण्यात आले होते.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) त्यांच्या अधिकृत हँडलवर एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये क्रिकेटपटू बेंगळुरू विमानतळावर प्रवेश करताना दाखवले आहेत. प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात महिला क्रिकेट संघाला हिरवा झेंडा दाखवला.
https://www.instagram.com/tv/CgZNVrUA7iF/?utm_source=ig_web_copy_link
भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने स्पष्ट केले की तिचा संघ केवळ पोडियम फिनिश करून आनंदी होणार नाही तर इतिहास रचताना सुवर्णपदक जिंकण्याचे संघाचे ध्येय आहे.
स्मृती मंधाना म्हणाली की, “सर्व मुली खूप उत्साहित आहेत आणि आम्हाला त्यांच्या भावना माहित आहेत. आपल्या सर्वांना भावना माहित आहे कारण आपण सर्वजण राष्ट्रकुल खेळ आणि ऑलिम्पिक पाहतो, जेव्हा भारताचा तिरंगा फडकतो आणि आपण राष्ट्रगीत ऐकतो तेव्हा प्रत्येकाला ती भावना माहित असते आणि अर्थातच आम्ही सुवर्णासाठी लक्ष्य केले आहे.”
मंधाना पुढे म्हणाली, “मला वाटत नाही की आम्ही फक्त पोडियम फिनिशवर लक्ष केंद्रित करत आहोत कारण जेव्हा तिरंगा वर जातो आणि राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा ही सर्वोत्तम भावना असते.” ७ ऑगस्ट रोजी एजबॅस्टन येथे सुवर्णपदकाची लढत होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या दर्शकांसाठी मेजवाणी! आयपीएलनंतर ‘या’ मोठ्या स्पर्धांचे सामने दिसणार डिज्नी-स्टारवर
पॉंटिंग म्हणतोय, “त्याला पाहून मला सायमंड्स आठवतो”