भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने सलग दुसऱ्या वनडे सामन्यात बाजी मारली आहे. सलामीवीर स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्मा यांच्या झंझावाती खेळींच्या जोरावर भारतीय संघाने १० विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात (IND vs SL) प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित ५० षटकात १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २५.४ षटकातच श्रीलंकेचे आव्हान पूर्ण केले आणि सामना नावावर केला.
श्रीलंकेच्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मामध्ये (Shafali Varma) अभेद्य भागीदारी झाली. मंधानाने ८३ चेंडूंत १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा चोपल्या. तसेच शेफालीने ७१ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने १ षटकार आणि ४ चौकारही मारले. अशाप्रकारे या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची अभेद्य भागीदारी झाली आणि भारतीय संघाने २६व्या षटकात श्रीलंकेचे लक्ष्य पूर्ण केले.
Renuka Singh scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the second #SLvIND ODI. 👏 👏
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjSAUt pic.twitter.com/YxWvZ212ed
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून ऍमा कंचाना हिने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या होत्या. ८३ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या मदतीने तिने ही खेळी खेळली होती. निलाक्षी डी सिल्वा हिनेही ३२ धावांचे योगदान दिले होते. कर्णधार चमीरा अट्टापट्टू (२७ धावा) आणि अनुष्का संजीवनी (२५ धावा) यांनीही थोडेफार योगदान दिले होते. या डावादरम्यान श्रीलंकेच्या ३ फलंदाज शून्यावर बादही झाल्या होत्या.
या डावात भारताकडून रेणुका सिंग हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. १० षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत तिने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना बाद केले. तसेच मेघना सिंग आणि दिप्ती शर्मा यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूत धाडले.
आता भारत विरुद्ध श्रीलंकेतील तिसरा व अखेरचा सामना गुरुवारी (०७ जुलै) होईल. भारतीय संघ हा सामनाही जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी प्रयत्न करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बेन स्टोक्स स्वत:ची विकेट वाचवण्याचा प्रयत्नच करत नव्हता’, माजी क्रिकेटरने टोचले कान
धोनीनंतर भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनत चाललाय पंत..! खास यादीत माहीसोबत नोंदवलंय नाव
चेंडूच ‘असा’ होता की…, पाहा विराटच्या सपोर्टमध्ये काय म्हणाला इंग्लंडचा माजी फिरकीपटू