प्रथमच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात सर्व भारतीय व विदेशी खेळाडूंवर पैशांची चांगलीच बारिश झाली. सध्या भारतीय संघात खेळत असलेल्या सर्वच प्रमुख खेळाडूंवर बोली लागल्याने या खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण होते. दक्षिण आफ्रिकेत टी20 विश्वचषक खेळत असलेल्या या संघाने खेळाडूंवर बोली लागल्यानंतर जोरदार जल्लोष केला. त्या जल्लोषाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात भारतीय खेळाडूंना मोठी मागणी राहणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष लिलावात देखील हा अंदाज खरा ठरला. लिलावात पहिलेच नाव भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिचे आले. तिच्यावर जवळपास सर्व संघांनी बोली लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तिला 3 कोटी 40 लाखांची मोठी बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही 1 कोटी 80 लाखांची बोली मिळवली.
Video of the day – celebration by Smriti & Indian team. pic.twitter.com/djAS0lVb6n
— Johns. (@CricCrazyJohns) February 13, 2023
त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतून लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहत असलेल्या भारतीय संघाने चांगलाच जल्लोष केला. खेळाडूंनी एकमेकींना मिठ्या देखील मारल्या. तसेच सर्व खेळाडू स्मृती व हरमनचे अभिनंदन करताना दिसल्या.
या दोघींनी व्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा व शफाली वर्मा या तिघींना देखील दोन कोटींपेक्षा अधिकची बोली लागली. तसेच युवा यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकार व रिचा घोष यांना देखील दीड कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाल्या. हरलीन देओल, राधा यादव, शिखा पांडे यादेखील लिलावात संघांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्या.
( Indian Womens Celebration After Smriti Mandhana Harmanpreet Kaur WPL Auction)