भारतीय पुरुष आणि महिला संघ येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या दौर्यावर जाणार आहेत. पुरुष संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर भारतीय महिला संघ इंग्लंड संघाशी कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे.
मात्र अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने दोन्ही संघांना कडक नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. यानुसार इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर दोन्ही संघांना विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करणे, बंधनकारक आहे. पुरुष संघाला साऊथम्पटनच्या मैदानावर पहिला सामना खेळायचा असल्याने तिथेच एका हॉटेलमध्ये ते विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करतील. पण आता आलेल्या बातमीनुसार महिला संघही पुरुष संघासोबतच विलगीकरणात असेल.
खरंतर दोन्ही संघांना याबाबत इंग्लंड बोर्डाच्या सविस्तर नियमावलीची अद्याप प्रतीक्षा आहे. मात्र याबाबत माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हंटले की, “भारतीय महिला संघाला त्यांचा कसोटी सामना ब्रिस्टल शहरात खेळायचा आहे. पण महिला संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर थेट ब्रिस्टलला जाणार नाही. तर पुरुष संघासह महिला संघ देखील साऊथम्पटनच्या हॉटेलमध्ये आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करेल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अद्याप आम्हाला दौर्याचा कार्यक्रम पाठवला नाही आहे. त्यामुळे महिला संघ साउथम्पटन मधील विलगीकरण संपल्यावरच ब्रिस्टलला रवाना होईल, अशी सध्याची योजना आहे.”
पुरुष संघाला साऊथम्पटनच्या हिल्टन हॉटेलमधे मुक्कामाला ठेवले जाईल, अशी सोय करण्यात आली आहे. हे हॉटेल विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार्या हॅम्पशायर बाऊल मैदानाचाच हिस्सा आहे. महिला संघ याच हॉटेलमध्ये मुक्कामाला असेल. हे हॉटेल बायो बबलचाच भाग असेल. महिला संघ १६ ते १९ जून दरम्यान इंग्लंड संघाशी आपला कसोटी सामना खेळेल. तर पुरुष संघ १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडच्या संघाशी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन हात करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
खूप साऱ्या भाज्या ते डोसा, रनमशीन विराट कोहलीचा कसा असतो डाएट, घ्या जाणून
“टेस्ट चॅम्पियशीप फायनल माझ्यासाठी विश्वचषकाप्रमाणेच” या किवी गोलंदाजाची भारतीय संघाला चेतावणी
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला व्हायचे होते क्रिकेटपटू; धवनसोबत खेळला आहे क्रिकेट, विराटचाही चांगला मित्र