---Advertisement---

खूप साऱ्या भाज्या ते डोसा, ‘रनमशीन’ विराट कोहलीचा कसा असतो डाएट, घ्या जाणून

On: रविवार, मे 30, 2021 10:28 PM
---Advertisement---

आजकाल क्रिकेटच नाही तर जवळपास सर्वच खेळांतील खेळाडू फिटनेसकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. भारतीय क्रिकेट संघात तर खेळाडूंचा फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही वर्षात राहिला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेससाठीच अनेकांचा आदर्श आहे. विराटने गेल्या काही वर्षांत भारतीय संघातील खेळाडूंनाही फिटनेसचे महत्त्व समजावून दिले आहे. विराटचा फिटनेसपाहून अनेकांना त्याच्या डाएटबद्दल जाणून घेण्यात रस आहे, आता याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला आहे.

असा आहे विराटचा डाएट 
विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघासह मुंबईत क्वारंटाईनमध्ये आहे. या क्वारंटाईन कालावधीदरम्यान त्याने शुक्रवारी (२९ मे) इंस्टाग्रामवर प्रश्न-उत्तरांचे सत्र आयोजित केले होते. यादरम्यान, चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले, त्यातील काही प्रश्नांची त्याने उत्तरे दिली.

यातील एक प्रश्न त्याच्या डाएडबद्दलचाही होता. त्याला एका चाहत्याने विचारले होते की ‘तुझे डाएट कसे असते?’ त्यावर विराटने उत्तर दिले की ‘खूप साऱ्या भाज्या, काही अंडी, २ कप कॉफी, डाळ, किनोआ, खूप सारे पालक, डोसा मला फार आवडतो. पण सर्वकाही प्रमाणातच.’

Screengrab: Instagram/Virat Kohli

दुसऱ्या एका चाहत्याने त्याला विचारले की तो एका दिवसात काय खातो. त्यावर विराटने उत्तर दिले की ‘बरेच भारतीय पदार्थ, जे साध्या पद्धतीने बनवलेले असते. कधी कधी चायनीजपण. बदाम, प्रोटीन बार आणि फळं.’

विराट त्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल फार शिस्तप्रिय असल्याचे म्हटले जाते, त्याने अनेक पदार्थ त्याच्या फिटनेससाठी वर्ज्य केले आहेत.

विराट इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज 
विराट पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यात भारताला साउथँम्पटन येथे न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“टेस्ट चॅम्पियशीप फायनल माझ्यासाठी विश्वचषकाप्रमाणेच” या किवी गोलंदाजाची भारतीय संघाला चेतावणी

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला व्हायचे होते क्रिकेटपटू; धवनसोबत खेळला आहे क्रिकेट, विराटचाही चांगला मित्र

केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---