ADVERTISEMENT

केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने


मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतर हा हंगाम पूर्ण होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह होते. मात्र, २९ मे रोजी बीसीसीआयने स्पष्ट केले की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हा हंगाम युएईमध्ये पूर्ण केला जाईल. पण असे असतानाच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संघातील प्रमुख खेळाडूनेच या उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे.

कोलकाताला धक्का
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स उर्वरित आयपीएल २०२१ हंगामात सहभागी होणार नाही. त्यामुळे कोलकाता संघाला मोठा धक्का बसला आहे. कमिन्स संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. कमिन्सला कोलकाताने आयपीएल २०२० च्या लिलावात १५ कोटी ५० लाख रुपये मोजत संघात सामील करुन घेतले होते. तो गेल्या २ हंगामापासून कोलकाता संघाचा भाग आहे. मात्र आता तो आयपीएल २०२१ मध्ये खेळताना दिसणार नाही.

याशिवाय असेही समोर येत आहे की ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या उर्वरित हंगामात सहभागी होण्याची परवानगी देण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया बायो-बबलमध्ये अधिक वेळ घालवण्यामुळे क्रिकेटपटूंवर होत असलेल्या मानसिक परिणामांची चर्चा करेल.

‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार ‘कमिन्सने काही लाखांच्या आयपीएल कारारानंतरही आधीच सांगितले होते की तो पुन्हा या हंगामातील सामने खेळण्यासाठी परतणार नाही.’

तसेच या रिपोर्टमध्ये पुढे हे देखील सांगितले आहे की ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाला हा निर्णय करावा लागेल की बायोबबलमध्ये अधिक वेळ घालवण्यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही. तसेच आयपीएलमुळे खेळाडूंना विश्वचषकासाठी तयार होण्यात मदत मिळेल की नाही, कारण या टी२० विश्वचषकाचे आयोजन देखील युएईमध्ये होण्याची शक्यता आहे.’

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहाता हा विश्वचषक युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन खेळाडूंना बराच काळ बायोबबलमध्ये रहावे लागू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करेल.

आयपीएल स्थगितीनंतर जवळपास १ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू परतले घरी
खरंतर आयपीएल २०२१ स्थगित झाले तेव्हा ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी सीमाबंदी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवला जाऊन २ आठवडे घालवावे लागले. त्यानंतर सीमा उघडल्यानंतर ते मायदेशी परतले. मात्र सरकारच्या नियमांप्रमाणे सर्वांना हॉटेलमध्ये १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. म्हणजेच जवळपास १ महिना ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल स्थगितीनंतरही कुटुंबापासून दूर होते.

इंग्लंडचे खेळाडूही होणार नाही सहभागी
उर्वरित आयपीएल २०२१ हंगामात इंग्लंडचे खेळाडूही सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. कारण उर्वरित हंगामादरम्यान इंग्लंड संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यात व्यस्त असणार आहे.

पॅट कमिन्सची आयपीएल २०२१ मधील कामगिरी 
कमिन्सने आयपीएल २०२१  हंगाम स्थगित होण्यापूर्वी केकेआरकडून ७ सामने खेळले. यात त्याने ९ विकेट्स घेतल्या. तसेच ९३ धावाही केल्या. याशिवाय कमिन्सने हा हंगाम सुरु असताना भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात ५०००० डॉलर दान केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

ख्रिस्टियानो रोनाल्डोबाबत कोहलीने गूगलवर सर्च केली होती ‘ही’ गोष्ट

कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंत ‘याने’ मारलेत सर्वाधिक षटकार, दोन भारतीयांचा समावेश

दैदीप्यमान कारकीर्द असूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे ‘ही’ खंत


Related Posts

Next Post
ADVERTISEMENT