टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अकराव्या दिवशी महिला हॉकी संघाने जो कारनामा केला ते पाहून कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटला असेल. भारतीय महिला हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघ या दोन्ही संघांमध्ये सोमवारी (२ ऑगस्ट) उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक दिली आहे. भारतीय महिला संघाने १-० ने विजय मिळवत ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीनंतर स्कोर ०-० असा होता. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या २२ व्या मिनिटात भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. ही संधी भारतीय संघाने चुकवली नाही. मिळालेल्या संधीचे सोने करत गूरजीत कौरने पहिला गोल केला आणि भारतीय संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली. हा या सामन्यातील एकमात्र गोल होता.(Indian women’s hockey team beat australian women’s hockey team in quarter final to enter in semis)
A goal that will go in the history books! 🙌
Watch Gurjit Kaur's brilliant drag flick that led #IND to a 1-0 win over #AUS in an epic quarter-final 😍#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #Hockey | #BestOfTokyo pic.twitter.com/MkXqjprLxo
— Olympic Khel (@OlympicKhel) August 2, 2021
सामना झाल्यानंतर गुरजीतने म्हटले की ,”खूप, खूप आनंद होत आहे. प्रत्येक दिवस आम्ही खूप जास्त सराव करत होतो. मुख्यतः गेल्या २ दिवसात. आम्ही पहिल्यांदाच उपांत्यफेरीत पोहोचलो आहोत. भारताला गर्व आहे. सर्वच समर्थन करत आहेत. हा नेहमीच एक खास अनुभव असतो. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळाले आहे. आम्ही फक्त एक गोल केला आणि तो वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. संपूर्ण देशाने आम्हाला पाठिंबा दिला, सर्वांचे मी आभार मानते.”
उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघाने भारताला पदक मिळवून देण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. आता भारताचा उपांत्य फेरीतील सामना ४ ऑगस्ट रोजी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी ‘या’ खेळाडूंना मिळू शकते भारताच्या ‘प्लेइंग ११’मध्ये खेळण्याची संधी
ऐतिहासिक! ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या एकमेव भारतीय घोडेस्वाराची अंतिम फेरीत
भारीच! ऑलिम्पिकमध्ये घडला इतिहास, खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत वाटून घेतले सुवर्णपदक