विंडिजमध्ये नोव्हेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा झाली आहे. या भारतीय संघाचे कर्णधारपदी हरमनप्रीत कौरला तर उपकर्णधारपदी स्म्रीती मानधनाला कायम ठेवण्यात आले आहे.
या विश्वचषकासाठी भारतीय संघात जेमिमा रोड्रिगेज, मिताली राज, वेदा क्रिष्णमुर्थी, तानिया भाटीया अशा फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तर दिप्ती शर्मा, अनुजा पाटिल आणि पूजा वस्त्राकर या अष्टपैलू खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे.
गोलंदाजांच्या फळीत एकता बिश्त, पुनम यादव, राधा यादव. हेमलता, मानसी जोशी यांचा समावेश आहे.
हा टी20 विश्वचषक 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. भारतीय संघाचा या विश्वचषकामधील साखळी फेरीसाठी ब गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, आयर्लंड, न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियाचा समावेश आहे.
2009 पासून सुरु झालेल्या महिला टी20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक वेळा आॅस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले आहे. त्यांनी 3 वेळा टी20मध्ये विश्वविजेते मिळवले आहे. तसेच इंग्लंड आणि विंडिजने प्रत्येकी एकदा विश्वविजेतेपदाचे मानकरी ठरले आहेत.
मात्र भारतीय संघाची या स्पर्धेत खास काही कामगिरी झालेली नाही. भारताने 2009 आणि 2010 मध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
या स्पर्धेची 9 नोव्हेंबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने सुरवात होणार आहे. हा सामना गयाना नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ साखळी फेरीत 11 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळेल. तसेच साखळी फेरीत भारत अनुक्रमे 15 आणि 17 नोव्हेंबरला आयर्लंड आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.
या महिला टी20 विश्वचषकात एकूण 23 सामने होणार असुन यावेळी पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात डिसीजन रिव्यू सिस्टम (डिआरएस) चा वापर होणार आहे.
तसेच महिलांच्या क्रिकेटकडे लक्ष वेधण्यासाठी या सामन्यांचे लाईव्ह प्रसारणही करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा गयाना नॅशनल स्टेडियम, सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियम आणि अँटिगामधील सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंड अशा 3 स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
अँटिगामधील सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर 22 नोव्हेंबरला होणारे दोन्ही उपांत्य फेरीतील सामने आणि 24 नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना पार पडेल.
असा आहे महिला टी२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधाना (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिगेज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्त, डी हेमालाथा, मानसी जोशी, पूजा वस्त्रकाप, अरुंधती रेड्डी
महत्वाच्या बातम्या-
–भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम
–गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार
–भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम