भारतीय महिला क्रिकेट संघाची (India Womens Cricket Team) कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) मंगळवारी (5 नोव्हेंबर) रोजी जाहीर झालेल्या आयसीसी (ICC) महिला एकदिवसीय क्रमवारीत संयुक्त नवव्या स्थानावर पोहोचली आहे, तर भारताची स्टार सलामीवीर स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) चौथ्या स्थानी कायम आहे.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने (Harmanpreet kaur) 63 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी करत भारतीय संघाला सामना जिंकवत मालिकेत देखील विजय मिळवून दिला. हरमनप्रीतने एकदिवसीय आयसीसी क्रमवारीत 3 स्थानांनी झेप घेत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. ही मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती जी भारताने 2-1 ने जिंकली.
याच सामन्यात 100 धावांची शानदार खेळी खेळणारी भारताची स्टार डावखुरी फलंदाज स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) क्रमवारीत 728 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर इंग्लंडची नॅट सिव्हर ब्रंट 760 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
भारतीय संघ आयीसी (ICC) महिला चॅम्पियनशिप गुणतालिकेत 25 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड 21 सामन्यांत 20 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया (18 सामने) आणि इंग्लंड (21 सामने) समान 28 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत.
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने भारतासाठी 135 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 38च्या सरासरीने फलंदाजी करत 3,648 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 19 अर्धशतकासह 6 शतके आहेत. दरम्यान तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 171 राहिली आहे.
स्म्रीती मानधनाच्या (Smriti Mandhana) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने भारतासाठी 88 सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 45च्या सरासरीने फलंदाजी करताना 3,690 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने 27 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत. दरम्यान तिची सर्वोच्च धावसंख्या 136 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!
IPL 2025; संघाने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने अनफाॅलो करत फोटोही केले डिलीट
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय फलंदाज