सध्या भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघात (India Women’s Team vs West Indies Women’s Team) 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी धुव्वा उडवला आहे. यासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम खेळताना 358 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 243 धावांत गारद झाला. भारतीय संघाच्या विजयात सर्वात मोठा वाटा ‘हरलीन देओल’चा (Harleen Deol) होता, जिने 115 धावांची खेळी केली.
या सामन्यात भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतिका रावल (Pratik Raval) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली आणि दोघींमध्ये 110 धावांची भागीदारी झाली. मानधनाने 53, तर प्रतिकाने 76 धावा केल्या. हरलीन देओलने 115 धावांची शतकी खेळी खेळली, तर जेमिमाह रॉड्रिग्जने 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून भारताची धावसंख्या 350च्या पुढे नेली.
या मालिकेतील पहिला सामना भारताने 211 धावांनी जिंकला होता. दुसरा सामना 115 धावांनी जिंकल्यानंतर भारत मालिकेत 2-0 ने पुढे आहे. वेस्ट इंडिजकडून 359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार ‘हेली मॅथ्यूज’ने (Hayley Matthews) 106 धावांची खेळी केली, पण तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळू शकली नाही. ‘शमन कॅम्पबेल’ने (Shemaine Campbelle) निश्चितपणे 38 धावांचे योगदान दिले, पण ते संघाच्या विजयासाठी अपुरे ठरले.
एकीकडे वेस्ट इंडिजने एकूण 8 गोलंदाजांचा वापर केला, मात्र या सर्वांचा भारतीय फलंदाजांनी चांगलाच पराभव केला. तर भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट्स ‘प्रिया मिश्रा’ने (Priya Mishra) घेतल्या. तिने 3 फलंदाजांना बाद केले. दीप्ती शर्मा (Deepti Sharma), तीता साधू (Titas Sadhu) आणि (Pratika Rawal) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शेवटच्या सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या ‘रेणुका ठाकूर’ने (Renuka Thakur) या सामन्यात 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे जवळपास पक्के? आकडेवारीही दमदार
वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेटपटू बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया कधी मैदानात उतरणार? येथे होणार पाकिस्तानशी सामना; सर्वकाही जाणून घ्या