---Advertisement---

वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 4:08 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. त्यात रवी कुमार दहियाने उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. मात्र, दीपक पुनियाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यात अपयश आले. बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात दीपकला खास कामगिरी करता आली नाही. त्याला अमेरिकेच्या डेव्हिड टेलरकडून पराभूत व्हावे लागले.

पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटातील उपांत्य सामना भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया आणि अमेरिकेच्या डेव्हिड टेलरमध्ये झाला. हा सामना टेलरने १०-० ने खिशात घातला. (Indian wrestler Deepak Punia (86kg) loses to American David Morris Taylor in Olympics semifinal, to fight for bronze now)

https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1422862857645924352

पहिल्या राऊंडमध्ये दोन्ही कुस्तीपटूंनी खूप उशिरापर्यंत पहिला गुण मिळवण्यासाठी संघर्ष केला. शेवटी टेलरने पहिला गुण मिळवला आणि दीपकला जाळ्यात अडकवले. यानंतर त्याने एकापाठोपाठ एक असे ७ गुण मिळवले. त्यानंतर आणखी ३ गुण मिळाले. यासह तो १०-० ने पहिल्या राऊंडमध्येच दीपकला तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारावर पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचला.

आताही जिंकू शकतो कांस्य पदक
दीपककडे अंतिम फेरीचे तिकीट गमावल्यानंतरही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. यासाठी त्याला पुढच्या सामन्यात टेलरकडून पराभूत झालेल्या कुस्तीपटूंमध्ये रेपचेज राऊंडमध्ये जिंकणाऱ्या कुस्तीपटूविरुद्ध विजय मिळवावा लागेल.

यापूर्वी उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या लिन झ्यूशेन दीपकचा प्रतिस्पर्धी होता. दोघांमध्ये अखेरपर्यंत काट्याची टक्कर पाहायला मिळाली. सामना संपायला केवळ ४० सेकंदाचा अवधी शिल्लक असताना दीपकने मोठा डाव खेळला आणि झ्यूशेनला ६-३ ने पराभवाची धूळ चारली. यासह दीपकने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतीय कुस्तीपटूंचा नादच खुळा! रवी दहियानंतर दीपक पुनियाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश

-मन जिंकलंस भावा! रवी कुमार दहियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; बल्गेरियन कुस्तीपटूला केले १४-४ ने चितपट

-क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---