टोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी चीनची वेट लिफ्टर झिहुई हो हिचे डोपिंगविरोधी अधिकाऱ्यांकडून परीक्षण केले जाणार आहे. या परीक्षणात जर ती पॉझिटिव्ह झाली, तर भारताच्या मिराबाई चानूला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल.
झुहुई हो हिला टोकियोमध्ये राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. तसेच तिचे परीक्षणही केले जाईल. याबाबत माहिती असणाऱ्या एका सूत्राने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, चीनने झिझुई हो हिने शनिवारी एकूण २१० किलो वजनसह सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच एक नवीन विक्रम बनवला होता. (Indian Wrestler Mirabai Chanu May Get Gold Tokyo Olympics )
नियम काय सांगतात?
नियम सांगतात की, जर कोणताही ऍथलिट डोपिंग टेस्टमध्ये अयशस्वी ठरला, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या ऍथलिटला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल. मिराबाई चानूने शनिवारी टोकियो ऑलिंपिकमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून भारतासाठी पहिले पदक मिळवले होते.
या सामन्यात चानूने स्नॅच ८७ किलो आणि क्लीन एँड जर्क मध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले. चीनच्या झिहुई हो हिने एक नवीन ऑलिंपिक विक्रम बनवला, तर इंडोनेशियाच्या विंडी केंटिका आयशाने एकूण १९४ किलो वजन उचलत कांस्य पदक जिंकले होते.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Weightlifting
Women's 49kg ResultsSilver lined beginning for India! @mirabai_chanu wins Silver medal in @Tokyo2020 Weightlifting becoming the only 2nd Indian weightlifter ever to win an #Olympics medal. #WayToGo champ #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/oNqElqBGU2
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
यासोबतच तिने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे. ती ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी २००० सिडनी ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजनी गटात पहिले कांस्य पदक जिंकले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-किती भारी ना! मिराबाई चानूला आयुष्यभर मिळणार मोफत डॉमिनोज पिझ्झा; ट्वीट करत केले कौतुक
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’