टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताची निराशाजनक सुरुवात झाली. हॉकीमध्ये भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता कुस्तीतूनही वाईट बातमी येत आहे. महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या १/८ फायनल राऊंडमध्ये ऑलिंपिक पदार्पण करणाऱ्या भारताच्या सोनम मलिकला मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
सामन्यात सोनमने २-० ने आघाडी घेतली होती. मात्र, बोलोर्तुयाने पुनरागमन करत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. बोलोर्तुयाला २ टेक्निकल गुण मिळाले. याच आधारे तिला हा सामना जिंकण्यात यश आले. (Indian Wrestler Sonam Malik has lost her first match against Mongolia’s Bolortuya K. in Round of 8)
#IND have lost the semi-final against #BEL by 2-5. 💔
They are still in the medal hunt as they will fight it out in the #bronze medal match. #Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #Hockey
— Olympic Khel (@OlympicKhel) August 3, 2021
आता सोनमला जर कांस्य पदकाचा सामना खेळायचा असेल, तर बोलोर्तुयाचे अंतिम सामन्यात पोहोचणे गरजेचे आहे.
सोनम ऑलिंपिक्स खेळांमध्ये पात्र ठरणारी सर्वात कमी वयाची (१९ वर्षीय) भारतीय पैलवान आहे. ती आशियाई ऑलिंपिक्स पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिली. ती हरियाणाच्या सोनीपतची रहिवासी आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव
-कौतुक तर होणारच! भारतीय हॉकी महिला संघाची ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनीही थोपटली पाठ