सध्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) सुरु आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. तर भारताची शान म्हटल्या जाणाऱ्या विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत जपानच्या यूई सुसाकी (Yui Susaki) हिला पराभूत करुन दमदार सुरुवात केली. जपानी कुस्तीपटू यूई सुसाकी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता होती.
यूई सुसाकीनं (Yui Susaki) चढाओढीत पहिला गुण मिळवला, पण शेवटच्या क्षणी विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) ‘दंगल’सारख्या फिल्मी स्टाईलमध्ये बाजी मारली. तिनं पहिले दोन गुण घेतले, तर त्यानंतर तिला आणखी एक गुण मिळाला. अशाप्रकारे तिनं ही लढत 3-1 अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
विनेश फोगाटसाठी (Vinesh Phogat) हा सामना अवघड मानला जात होता, परंतू विनेश फोगाटनं चमकदार कामगिरी करुन भारताच्या आणखी एका पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत तिनं अनेक चढउतार पाहिले आहेत. यादरम्यान, तिनं सर्व अडथळे पार करत यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या-
“तो गर्विष्ठ नाही…” दिग्गज खेळाडूच्या बालपणीच्या प्रशिक्षकानं केला मोठा दावा
‘2027 विश्वचषकानंतरचा कर्णधार…’, माजी भारतीय प्रशिक्षकाने शुबमन गिलबद्दल केली मोठी भविष्यवाणी
T20 World Cup: सत्तापालटानंतर बांग्लादेशवर टांगती तलवार, टी20 विश्वचषकाचे यजमानपद धोक्यात