भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात, भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने उत्तम कामगिरी केली आहे. रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्याने आपले कसोटी पदार्पण करत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 3 फलंदाजांना बाद केले. यासोबतच भारताच्या पहिल्या डावात फलंदाजीत देखील सुंदरने अर्धशतक झळकावले. या अर्धशतकी खेळीत सुंदरने एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
तो ऑस्ट्रेलियामध्ये आपले कसोटी पदार्पण करताना अर्धशतकीय खेळी करणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. सुंदर पूर्वी 1947 साली दत्तू फडकर यांनी सिडनी येथे आपल्या पदार्पणात ऑस्ट्रेलियामध्ये अर्धशतकीय खेळी केली होती. तसेच सुंदरचा संघ सहकारी मयंक अग्रवालने 2018 साली ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पदार्पण करत 76 धावांची शानदार खेळी केली होती.
सुंदरने 144 चेंडूंचा सामना करत 62 धावांची उत्तम खेळी केली. या खेळी दरम्यान सुंदरने 7 चौकार व 1 षटकार देखील ठोकला. सुंदरने शार्दुल ठाकुर सोबत सातव्या विकेटसाठी तब्बल 123 धावांची शानदार भागीदारी केली. सुंदरसह शार्दुलने देखील 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकांमुळे भारताने पहिल्या डावात 336 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
गेट वेल सून टीम इंडिया! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान चाहतीने झळकावले अनोखे पोस्टर, फोटो व्हायरल
दुर्दैवी! सांगलीत क्रिकेट खेळताना मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू
SL vs ENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय दृष्टीक्षेपात, केवळ ३६ धावांची गरज