टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुषांच्या गोल्फ स्पर्धेतील राऊंड १ पार पडला. यामध्ये दोन भारतीय गोल्फर्सचा समावेश होता. ते म्हणजे अनिर्बन लहिरी आणि उदयन माने होय. यात आपली दुसरीच ऑलिंपिक स्पर्धा खेळत असलेल्या अनिर्बन लहिरीने मजबूत सुरुवात केली होती. त्याने पहिल्या फेरीत ४ अंडर ६७ चा स्कोर केला होता.
यामध्ये आशियाई टूरचा माजी अव्वल खेळाडू असलेल्या अनिर्बनने सहा बर्डी लावले आणि दोन बोगी केल्या. त्याने या स्पर्धेच्या राऊंड १ मध्ये संयुक्तरीत्या ८ वा क्रमांक पटकावला. (India’s Anirban Lahiri is tied in Eight place In The 1st Round Tokyo Olympic)
I could feel the support all the way from home today 🙏🏻 Solid 67 (-4) here in round one at @OlympicGolf #currypower let’s keep going 💪🏻@WeAreTeamIndia #Tokyo2020 pic.twitter.com/JaIhivCZYv
— Anirban Lahiri (@anirbangolf) July 29, 2021
याव्यतिरिक्त भारताचा दुसरा गोल्फर उदयन माने हा देखील काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला तब्बल ६० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे अनेक खेळाडू यादरम्यान वातावरण खराब असल्यामुळे स्पर्धेत खेळू शकले नव्हते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना