---Advertisement---

‘क्लबमध्ये स्वागत आहे’, भारताचे दिग्गज बॉक्सर विजेंदर अन् मेरीने केले लवलीनानाचे अभिनंदन

On: शुक्रवार, जुलै 30, 2021 1:14 PM
---Advertisement---

शुक्रवारी (३० जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये महिला बॉक्सिंगमध्ये भारताची मान उंचावली आहे. ६९ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय लवलीना बोरगोहेनने माजी विश्वविजेती चीनी ताइपेच्या चेन निएन-चिनला ४-१ ने पराभूत केले. तसेच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह भारताच्या नावावर टोकियो ऑलिंपिकमध्ये दुसऱ्या पदकाची नोंद होणे निश्चित झाले आहे. या कामगिरीनंतर लवलीनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंनीही तिचे अभिनंदन केले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने लोवलीनाच्या विजयानंतर ऑलिंपिक पदक विजेता भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगशी चर्चा केली. यावेळी लवलीनाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “तिचे क्लबमध्ये स्वागत आहे.” (Indian boxing’s pioneers Vijender Singh, Mary Kom congratulate Lovlina Borgohain)

पुढे बोलताना ३५ वर्षीय विजेंदर म्हणाला की, “अविश्वसनीय फाईट होती. तिचे डावपेच कमालीचे होते. तिने तिच्या उजव्या हाताचा प्रभावीपणे वापर केला. यामुळे मला माझ्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण झाली. देव तिला आशीर्वाद देवो.”

त्याने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत तिचे अभिनंदनही केले. त्याने ट्वीट करत लिहिले की, “अभिनंदन भारत.” यासोबतच त्याने हॅशटॅग लोवलीना आणि टीम इंडियाही वापरले आहे.

https://twitter.com/boxervijender/status/1420954236859215890

याव्यतिरिक्त भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनेही तिचे कौतुक केले. टोकियोमध्ये असलेल्या मेरीने म्हटले की, “आम्ही या पदकाची वाट पाहत होतो. प्रत्येकाने खूप कष्ट घेतले. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे.”

विशेष म्हणजे गुरुवारी (२९ जुलै) झालेल्या सामन्यात मेरीला कोलंबियाच्या इंग्रीट वलेन्सीयाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यापूर्वी तिने सलग दोन सामन्यात विजय मिळवला होता.

विजेंदर सिंगने २००८ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक आपल्या नावावर केले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय पुरुष बॉक्सर होता. दुसरीकडे मेरी कोम २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये रोप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होती. आता त्यांना अशी अपेक्षा आहे की, लवलीनाना टोकियो ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी करेल.

लवलीनाला बुधवारी (४ ऑगस्ट) तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीचा सामना करायचा आहे.

कोण आहे लवलीना बोरगोहेन?
लवलीना ही केवळ २४ वर्षांची आहे. आसामच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या लवलीनाने ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास केला आहे. ती आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील सरुपथर विधानसभेच्या बरोमुखिया या छोटाशा गावातील राहणारी आहे. यापूर्वी तिने २ वेळा विश्व चँपियनशीपमध्ये पदक जिंकले आहे. असा पराक्रम करणारी ती आसामची पहिली बॉक्सर आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-बॉक्सिंगमध्ये भारताच्या पठ्ठ्याने जमैकाच्या ब्राऊनला केले पराभूत; उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्याने वाढल्या आशा

-बॉक्सिंगमधून वाईट बातमी! कोलंबियाच्या इंग्रीटपुढे मेरी कोमला पत्करावा लागला पराभव; असू शकते शेवटची ऑलिंपिक

-रॅपिड राऊंडमध्ये भारतीय नेमबाज मनु अन् राहीची असेल खरी परीक्षा; पात्रता फेरीत या स्थानावर मिळवलाय ताबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---