भारताचा पुरूष क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून (14 डिसेंबर) सुरूवात झाली आहे. हा सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कर्णधार केएल राहुल याचा हा निर्णय चुकल्याचे दिसले कारण पहिले तीन फलंदाज 48 धावसंख्येवरच बाद झाले होते.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता भारताने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याची विकेट गमावली आणि पुन्हा एकदा संघ अडचणीत आला. मात्र आर अश्विन (R Ashwin) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी संथ गतीने फलंदाजी करत संघाला 350च्या पार नेले. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 50 धावांची भागीदारी केली असून अश्विन 41 आणि कुलदीप 21 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विकेटकीपर रिषभ पंत यांनी भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला 100च्या पार नेले. पंत 46 धावा करत बाद झाला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेल्या अय्यरने पुजाराच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पुजारा 90 धावा करत तैजुल इस्लाम याचा शिकार ठरला. त्याने पुजाराला त्रिफळाचीत केले.
Lunch on Day 2 of the 1st Test.
After an early wicket, Ashwin & Kuldeep stitch a 55*-run partnership.#TeamIndia 348/7
Scorecard – https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/mkcYccH74H
— BCCI (@BCCI) December 15, 2022
बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल याची गोलंदाजी भारतासाठी घातक ठरली. त्याने भारताच्या पहिल्या डावात आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या. त्याने पुजाराबरोबरच शुबमन गिल आणि विराट कोहली यांना देखील बाद केले. गिल 20 तर कोहली एक धाव करत बाद झाला. त्याचबरोबर मेहेदी हसन मिराज यानेही राहुल आणि पंत या दोन विकेट्स घेतल्या आहेत.
भारताला आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी बांगलादेश विरुद्ध दोन्ही सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. या सामन्यात भारत राहुलच्या नेतृत्वात खेळत असून नियमित कर्णधार रोहित शर्मा हा हाताच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA World Cup 2022: मोरोक्कोचा स्वप्नभंग, फ्रांस सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये; अर्जेंटिनाशी भिडणार
घरच्या मैदानावर ओडिशा एफसी विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, एटीके मोहन बागानचे आव्हान