---Advertisement---

उमरान की अर्शदीप, कोणाला द्यावी संधी?, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा पंतला सल्ला

On: गुरूवार, जून 9, 2022 4:18 PM
Arshdeep-Singh-Rishabh-Pant-Umran-Malik
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सांभाळणारा कर्णधार केएल राहुल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले. त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून सध्यातरी कुणालाच घेतले नाही. मात्र, संघाची धुरा आता रिषभ पंत याच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता पंत त्याच्या नेतृत्वात कोणाला संघात स्थान देणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी संघनिवडीबाबत पंतला सल्ला दिला आहे.

भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) म्हणतात की, “अर्शदीपला (Arshdeep Singh) पहिली संधी द्यायला हवी. अर्शदीप हा डावखुरा गोलंदाज आहे, जो संघाच्या गोलंदाजीत विविधता आणतो. अर्शदीप आयपीएलमध्ये चांगला खेळला आहे. त्याला पहिली संधी मिळेल अशी आशा आहे. संघाकडे हार्दिक पंड्याचाही (Hardik Pandya) पर्याय आहे. पंड्याने आयपीएल फायनलमध्येही चांगली गोलंदाजी केली होती. तो चार षटके टाकू शकतो. मला वाटतं अर्शदीप नक्कीच खेळेल.”

शिवाय उमरान (Umran Malik) आणि अर्शदीप या दोघांची तुलना करताना लालचंद राजपूत म्हणतात की, “संघात डावखुरा गोलंदाज असणे खूप महत्त्वाचे आहे. एक-दोन सामन्यांनंतर उमरानला संधी मिळेल. पण मला वाटतं उमरानला पहिल्याच मॅचपासून खेळायला द्यायला हवं. त्याचा वेग जबरदस्त आहे.”

दरम्यान, २३ वर्षीय अर्शदीप सिंगला ३७ आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे. भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत जयदेव उनाडकट (Jaydev Unadkut), टी नटराजन (T Natrajan) आणि खलील अहमद (Khaleel Ahmed) यांना आजमावले आहे. हे सर्व डावखुरे गोलंदाज टीम इंडियात आपले स्थान पक्के करण्यात अपयशी ठरले. अर्शदीप डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो. त्याचवेळी उमरानची तुलना शोएब अख्तरसोबत केली जात आहे. २२ वर्षीय उमरानचा टी२० मधील स्ट्राइक रेट अर्शदीपपेक्षा चांगला आहे. जिथे उमरान प्रत्येक  १५व्या चेंडूवर एक विकेट घेतो, तर अर्शदीप १९व्या चेंडूवर विकेट घेतो. त्यामुळे आता यामालिकेत उमरान आणि अर्शदीपमध्ये कोणाला जास्त संधी मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला

केएल राहुलच्या ‘आऊट’ होण्याचा ‘या’ युवा फलंदाजाला फायदा, दिल्ली टी२०त देऊ शकतो सलामी

अशी कामगिरी करणारा ‘होप’ ठरला तिसराच फलंदाज; एकाचवेळी मोडले कोहली, रूटचे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---