भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रविवारी (5 जानेवारी) भारतीय फलंदाजांना रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) कोणत्याही कारणाशिवाय खेळण्याचे आवाहन केले. जेणेकरून भारतीय संघाला न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ज्या सलग 2 मालिका गमवाव्या लागल्या. त्या तांत्रिक अडचणींवर मात करता येईल.
न्यूझीलंडविरूद्ध आणि नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी चिंताजनक असल्याचे सुनील गावसकर म्हणाले. भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध 0-3 असा व्हाईटवाॅश मिळाला, तर बाॅर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
सुनील गावसकर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, “रणजी ट्रॉफीची पुढील फेरी 23 जानेवारीला आहे. बघूया या संघातील किती खेळाडू खेळतात. न खेळण्यामागे कोणतीही कारणे नसावी. जर तुम्ही त्या सामन्यांमध्ये खेळला नाही, तर रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध नसलेल्या खेळाडूंविरूद्ध गौतम गंभीरला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. वचनबद्धता आम्हाला वचनबद्धता हवी आहे. तू खेळत नाहीस. तुला जे करायचे आहे ते कर. पण भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी तू कसोटी संघात पुनरागमन करू शकत नाही.”
शेवटी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “यशस्वी जयस्वाल आणि नितीश कुमार रेड्डीसारख्या खेळाडूंना भारताचे आणि स्वतःचे नाव कमावण्याची भूक लागली आहे. अशा खेळाडूंची गरज आहे. तुम्हाला अशा खेळाडूंची गरज आहे जे त्यांच्या आयुष्याप्रमाणे विकेटचे रक्षण करतात. मला हे पहायचे आहे. कारण त्यावेळी इंग्लंडविरूद्ध टी20 सामने होणार आहेत. पण जे टी20 खेळत नाहीत, ते रणजी ट्रॉफीचे सामने खेळतील की नाही?”
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसारख्या वरिष्ठ खेळाडूची जागा भारतीय संघात असावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
सिडनी कसोटी ठरली ऐतिहासिक, या मैदानावर झाले 3 मोठे रेकाॅर्ड्स
रोहित शर्मा, विराट कोहलीची कसोटी कारकिर्द धोक्यात? पाहा आकडेवारी