भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. त्यातील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर भारतीय चाहते नाराज झाले आहेत. पण एक गोष्ट त्याहूनही त्रासदायक आहे. ती म्हणजे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नसल्याची बातमी आहे. एका रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी त्या खेळाडूंना शेवटचा इशारा दिला आहे, जे त्यांच्या म्हणण्यानुसार वागणार नाहीत.
इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून 184 धावांनी पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूप नाराज आहेत. ते भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये म्हणाले की, “पुरे झाले.”
गौतम गंभीरने कोणत्याही विशिष्ट खेळाडूकडे बोटे दाखवली नसली तरी परिस्थितीनुसार कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंवर त्याचा राग होता आणि त्याच्या नैसर्गिक खेळाचा दाखला देत तो योजनेनुसार खेळत नाही. यासोबतच या माजी भारतीय सलामीवीराने असेही सांगितले की, 6 महिन्यांसाठी खेळाडूंना मोकळा लगाम दिल्यानंतर आता तो खेळण्याचा मार्ग ठरवणार आहे आणि जे लोक हे अनुसरण करणार नाहीत त्यांना संघातून जावे लागेल.
भारतीय संघाची फलंदाजी सातत्याने फ्लाॅप ठरत आहे आणि असे असतानाही गंभीरने आपला दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाने 0-3 अशी मालिका गमावली. ऑस्ट्रेलिया फिरकीपटूंसमोर भारताची फलंदाजी कोलमडली आणि तेव्हापासून टाॅप ऑर्डर काही विशेष करण्यात अपयशी ठरत आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारत सामना वाचवण्यासाठी मजबूत स्थितीत होता. जेव्हा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजी करत होते. मात्र, टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरली. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. आता दोन्ही संघातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
BGT 2024-25: निवडकर्त्यांनी गौतम गंभीरचे ऐकले नाही, हेड कोचला चेतेश्वर पुजाराला संघात आणायचे होते
IND vs AUS: “आता खूप झाले….”, गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंवर नाराज
AUS दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारावर, अहवालात मोठा खुलासा