आज आयसीसीने २०१७ पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा चांगलाच बोलबाला राहिला आहे. त्याला २०१७ चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि २०१७ चा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या बरोबरच विराटला आयसीसीने आज जाहीर केलेल्या २०१७ च्या वनडे आणि कसोटी संघाचेही कर्णधार केले आहे.
आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये नेहेमीच भारतीय क्रिकेटपटूंचे वर्चस्व दिसून येते. २००४ पासून २०१७ पर्यंत भारताच्या ४ क्रिकेटपटूंनी आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे.
यामध्ये मागील वर्षी आर अश्विनने हा पुरस्कार मिळवला होता आणि या वर्षी विराटने हा पुरस्कार मिळवला. त्यामुळे सलग दोन वर्ष या पुरस्काराचा मान भारताच्या खेळाडूंना मिळाला आहे.
हे आहेत २००४ ते २०१७ पर्यंतचे आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू:
२००४ – राहुल द्रविड
२००५ – जॅक कॅलिस/ अँड्र्यू फ्लिंटॉफ
२००६ – रिकी पॉन्टिंग
२००७ – रिकी पॉन्टिंग
२००८- शिवनारायण चंद्रपॉल
२००९ – मिशेल जॉन्सन
२०१० – सचिन तेंडुलकर
२०११ – जोनाथन ट्रॉट
२०१२ कुमार संगकारा
२०१३ मायकल क्लार्क
२०१४ – मिशेल जॉन्सन
२०१५ स्टीव्ह स्मिथ
२०१६ – आर अश्विन
२०१७ – विराट कोहली