सध्या सुरू असलेल्या आशियाई गेम्समध्ये भारतीय संघ जोरदार कामगिरी करत आहे. मंगळवारी (3 ऑक्टोबर) देखील भारताची चमकदार कामगिरी सुरू राहिली. स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये अभय सिंग आणि अनाहत यांनी भारताचे अजून एक पदक निश्चित केली. या दोघांनी दक्षिण कोरियाच्या यांग येओनसू आणि डोंगजुन ली यांच्यावर विजय मिळवून उपांत्य फेरीत जागा पक्की केली.
भारत आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंमध्ये मंगळवारी झालेला सामना एकूण 32 मिनिटांपर्यंत खेळला गेला. अभय आणि अनाहत यांनी यांग आणि येओनसू यांच्यावर 11-4, 8-11 आणि 11-1 असा विजय मिळवला. आशियाई गेम्सचा हा 9वा दिवस असून भारताच्या पदकांची संख्या 60 पेक्षा अधिक झाला आहे. यात 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 23 कान्स पदकांचा समावेश आहे.
News Flash: Another medal assured in Squash ????
Anahat & Abhay advance into SEMIS of Mixed Doubles | 4th seeded Indian pair beat 9 seeds Korean duo 2-1 in QF. #IndiaAtAsianGames #AGwithIAS #AsianGames2022 pic.twitter.com/B6KTz89zxI
— India_AllSports (@India_AllSports) October 3, 2023
(India’s medal assured in Squash doubles mixed)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Countdown: वर्ल्डकप इतिहासात दिलशान-थरंगाची जोडी नंबर वन, 12 वर्षांपूर्वी रचलेला इतिहास
यासम हाच! यशस्वीने सगळंच गाजवलं, शतकांची यादी पाहून वाटेल अभिमान